अंतोऱ्याचा तरुण वर्धा नदीत बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 20:52 IST2019-09-27T20:50:10+5:302019-09-27T20:52:27+5:30

पत्ता न लागल्याने युवकाच्या कुटुंबीयांनी तिवसा पोलिसात याबाबत माहिती दिली आहे.

Antar's youth drowns in the Wardha River | अंतोऱ्याचा तरुण वर्धा नदीत बुडाला

अंतोऱ्याचा तरुण वर्धा नदीत बुडाला

ठळक मुद्दे गुरुवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना उघड झाली. २४ तास उलटूनही पत्ता न लागल्याने युवकाच्या कुटुंबीयांनी तिवसा पोलिसात याबाबत माहिती दिली आहे.

तिवसा - पोहायला गेलेल्या दोन तरुणांपैकी एक २१ वर्षीय तरुण वर्धा नदीपात्रात बुडाला. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना उघड झाली. २४ तास उलटूनही पत्ता न लागल्याने युवकाच्या कुटुंबीयांनी तिवसा पोलिसात याबाबत माहिती दिली आहे.
संजय भिकाजी नांदने (२१,रा.अंतोरा,ता.आष्टी) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. तो नेहमीप्रमाणे त्याचा मावसभाऊ सागर धनाजी केवदे (निंभोली शेंडे, ता.आर्वी) यांचेसह वर्धा नदीपात्रात पोहत तिवसानजिकच्या नमस्कारी भागाकडे येण्याचा प्रयत्न करीत असताना पाण्यात वाहून गेला. याची माहिती त्याचा सहकारी सागर केवदे यांनी नातेवाईकांना दिली. शनिवारी त्या युवकाला शोधण्यासाठी रेस्क्यू टीम नदीपात्राशेजारील चांदुर ढोरे, भारवाडी जुनी, उंबरखेड, धामंत्री, कौंडण्यपूर, मंगरूळ या भागात दाखल होणार आहे.

Web Title: Antar's youth drowns in the Wardha River