शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

राज्यात ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 3:38 PM

राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ६,८७१ सदस्यपदे रिक्त असलेल्या ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी जाहीर केला.

ठळक मुद्दे२६ फेब्रुवारीला मतदानरिक्त ६,८५१ सदस्यपदे आचारसंहिता लागू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ६,८७१ सदस्यपदे रिक्त असलेल्या ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी उशिरा जाहीर केला. ५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू होऊन २५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्रीपासून संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणूकपूर्व मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने १० जानेवारीला जाहीर केला होता. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध झाली. त्याचे एक दिवसपूर्व आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार निवडणुुकीची नोटीस २५ जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. ५ ते १० फेब्रुवारीदरम्यान उमेदवारी अर्ज मागविणे व सादर करणे, १२ फेब्रुवारीला अर्जांची छाननी, १५ फेब्रुवारीला उमेदवारी मागे घेणे, १५ फेब्रुवारीला चिन्ह वाटप, यादी प्रसिद्ध करणे, २५ फेब्रुवारीला मतदान व २६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.यावेळी आरक्षित जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. यापूर्वी सहा महिन्यांची मुदत दिली जायची. यावेळी मात्र, ही सुविधा नाकारल्यामुळे पुन्हा अनेक पदे रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज व शपथपत्र पारंपरिक पद्धतीनेच सादर करण्याची मुभा आयोगाने दिली आहे. यावेळी कोकण विभागात ४२, नाशिक विभागात ७५, पुणे विभागात १३२, औरंगाबाद विभागात ३५, अमरावती विभागात ११, तर नागपूर विभागात २२ अशा एकूण ३१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामध्ये सरपंचपदाची थेट जनतेमधून निवडणूक होणार आहे.जिल्हानिहाय पोटनिवडणुका असणाऱ्या ग्रामपंचायतीराज्यात ४,१०२ ग्रामपंचायतींच्या ६,८७१ रिक्त सदस्यपदांसाठी निवडणुुका होत आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात ७८, पालघर ६५, रायगड १६५, रत्नागिरी २६३, सिंधुदुर्ग ८०, नाशिक २७८, धुुळे ८४, जळगाव १३२, नंदूरबार ४१, अहमदनगर १२८, पुणे २७४, सोलापूर ११७, सातारा ४२७, सांगली ४२, कोल्हापूर १०९, औरंगाबाद ७३, बीड ४६, नांदेड १८९, परभणी ७३, उस्मानाबाद ७३, जालना ७८, लातूर ११०, हिंगोली ७९, अमरावती १३०, अकोला ९४, यवतमाळ २०६, वाशिम ५६, बुलडाणा १०६, नागपूर ६४, वर्धा ५६, चंद्रपूर ११४, भंडारा ३२, गोंदिया ६५ व गडचिरोली जिल्ह्यातील २०७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक