अंजनगाव सुर्जी शहरच आहे गुटखा विक्रीचे केंद्र बिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:09+5:302021-07-21T04:11:09+5:30
मागील दोन दिवस आधी एका दिवसाचा ठाणेदार पदाचा प्रभार असलेले सहायक पोलीस निरीक्षक विशाल पोळकर व त्यांच्या पथकाने अंजनगाव ...

अंजनगाव सुर्जी शहरच आहे गुटखा विक्रीचे केंद्र बिंदू
मागील दोन दिवस आधी एका दिवसाचा ठाणेदार पदाचा प्रभार असलेले सहायक पोलीस निरीक्षक विशाल पोळकर व त्यांच्या पथकाने अंजनगाव सुर्जी अंजनगाव सुर्जी शहरापासून काही अंतरावर असेल धाडी गावात राहत असलेल्या जाधव यांच्या घरी धाड टाकून १ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला . परंतु अंजनगाव सुर्जी शहरात मुख्य गुटखा किंग जोरात व्यवसाय करताना दिसून येत आहे यांच्यावर सुद्धा दुय्यम ठानेदार विशाल पोळकर यांनी त्यांच्या गुटखा गोडाऊन वर धाड टाकून कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे..
गुटखा या वेवसायात नवीन वेवसायिक धंदा करण्यात सुरवात करताच या धंद्यातील जुने वेवसाईक त्याच्यावर पाळत ठेवून पोलिसांना किंवा अन्न व ओषध प्रशासनाला टीप देऊन त्यांच्यावर धाड टाकून कार्यवाही करण्यात भाग पाडतात ,याचेच उदाहरण अंजनगाव सुर्जी शहरात पाहावयास दिसून येत आहे ,मागील काही वर्षांपासून गुटखा सारख्या वेवसायात आरी..नावाची वेक्ती मोट्या प्रमाणात वेवसाय करीत होती परंतु तात्कालिन पोलीस उपविभागीय अधिकारी ips सोमय मुंडे यांच्या दोन ते तीन कार्यवाही मुले लाखोंचा माल पकडल्या गेला व गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले होते त्यामुळे अश्या अधिकार्याच्या भीती मुळे आरी..याने आपला अवैध गुटखा वेवसाय पूर्ण पने बंद करून टाकला व नवीन दुसरा वेवसायात गुंतवणूक केली,
आरी..याने आपला अवैध गुटखा वेवसाय बंद करताच काही दिवसात तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी ips सोमय मुंडे यांची बद्दली होताच या अवैध वेवसायातील मंडली... व मोसी... या दोन वेक्तीने मोठया प्रमाणात अवैध गुटखा साठवणूक करून शहरा सह आजूबाजूच्या तालुक्यात व ग्रामीण भागात गुटखा विक्री खुले आम सुरवात केली,
परंतु यांच्यावर पोलीस विभाग व अन्न व ओषध प्रशासन विभाग कोणत्याच प्रकारची कार्यवाही करताना दिसून येत नाही ,
बॉक्स
सहायक पोलिस निरीक्षक विशाल पोळकर यांनी गुटखा बनवणारी मशीन सह जाधव नामक आरोपीस अटक केली परंतु आज रोजी अन्न व ओषध प्रशासनाच्या कोणत्याही अधिकारी यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनला भेट दिली नाही हे विशेष
बॉक्स
अंजनगाव ठाण्याचे डिबी पथक नावालाच ?
अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात डिबी पथक तयार करण्यात आले आहे ,परंतु मागील काही वर्षां पासून या पथकात एकच एक कर्मचारी काम करताना दिसतात तसेच अवैध दारू पकडण्या वेतिरिक्त दुसर्या कोणत्याही प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांना अपयश येत असल्याचे दिसून येते ,त्यामुळे हे पथक नावालाच आहे का अशी चर्चा पोलीस कर्मचारीच करत आहे....