शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

करजगावात जबरी लूट, वृध्दाचा निर्घुण खून करून सोने लुटले; वरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: February 14, 2023 18:28 IST

गाढ झोपेत असलेल्या वृध्दाची धारदार शस्त्राने हत्या करून जबरी लूट करण्यात आल्याची घटना अमरावतीत घडली. 

वरूड (अमरावती) : गाढ झोपेत असलेल्या वृध्दाची धारदार शस्त्राने हत्या करून जबरी लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील करजगाव गांधीघर येथे घडली. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास घडलेल्या या प्रकरणी वरूड पोलिसांनी अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल केला. शंकर सखारामजी अढाऊ (८३, रा.करजगाव गांधीघर )असे मृताचे नाव आहे. आरोपींनी त्यांच्या घरातून ५ ग्रॅम सोन्याचा दागिणे लंपास केले.

पोलीस सूत्रानुसार, शंकर अढाऊ व पत्नी सुलोचना हे दाम्पत्य सोमवारी रात्री जेवण करून झोपी गेले होते. रात्री ११ च्या दरम्यान अज्ञात तीन जण तोंडाला कापड बांधून त्यांच्या घरात शिरले. वृद्धेचे तोंड दाबून तिचे डोळे बंद करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एकाने वृद्धावर धारदार वस्तूने प्रहार करून त्यांचा खून केला. तर वृध्देच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले. तर कानातले निघत नसल्याने कान कापण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड होताच आरोपी पळून गेले. माहिती मिळताच बेनोडा ठाणेदार स्वप्नील ठाकरे, उपनिरीक्षक गणपत पुपुलवार यांच्यासह बेनोडा पोलिसांचा ताफा करजगावात दाखल झाला. पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, एसडीपीओ निलेश पांडे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. आरोपीच्या शोधाकरिता श्वान पथक, ठसे तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले.

 दत्तक मुलगा घराबाहेरअढाऊ दाम्पत्याचा दत्तक मुलगा विशाल सोमवारी रात्री बाहेर गेला होता. याच वेळी गावात ब्रह्मलीन दस्तगीर महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरु असल्याने ग्रामस्थ त्यात व्यस्त होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अढाऊ यांच्या घराकडे धाव घेतली. तर वृध्देच्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी अज्ञातांविरूध्द खून व जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. गळ्यातील मंगळसूत्र काढल्यानंतर कानातील दागिने काढण्याकरिता कान कापून काढा, असे ऐकल्यानंतर आपण जीवाच्या आकांताने ओरडलो, त्यामुळे आरोपी पळाल्याचे वृध्देने म्हटले आहे. कोटती घटना चोरी करण्याच्या उद्देशाने घडली असावी. यामध्ये वृद्धाला धारदार वस्तूने मारून ठार करण्यात आले. तर ५ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन चोर पसार झाले. त्या अज्ञात तिन आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली. - स्वप्नील ठाकरे, ठाणेदार, बेनोडा

 

 

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूtheftचोरीPoliceपोलिस