Amravati: पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतोस? संतप्त पतीने तरुणाचा केला खून

By प्रदीप भाकरे | Updated: July 9, 2023 14:42 IST2023-07-09T14:41:42+5:302023-07-09T14:42:19+5:30

Crime News: पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतोस, अशी विचारणा करून सावनेर येथील एका तरूणाला कोयत्याने संपविण्यात आले. त्यामुळे नांदगाव खंडेश्वर ते मोखड मार्गावरील मालानी गिट्टी खदानच्या गेटसमोर मृतावस्थेत आढळलेल्या आकाश गजानन सहारे याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Amravati: Why do you look down on your wife? The angry husband killed the young man | Amravati: पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतोस? संतप्त पतीने तरुणाचा केला खून

Amravati: पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतोस? संतप्त पतीने तरुणाचा केला खून

- प्रदीप भाकरे
अमरावती/नांदगाव खंडेश्वर : पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतोस, अशी विचारणा करून सावनेर येथील एका तरूणाला कोयत्याने संपविण्यात आले. त्यामुळे नांदगाव खंडेश्वर ते मोखड मार्गावरील मालानी गिट्टी खदानच्या गेटसमोर मृतावस्थेत आढळलेल्या आकाश गजानन सहारे (२५, रा. सावनेर) याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ जुलै रोजी दुपारी चार ते पाचच्या सुमारास तो प्रकार उघड झाला होता.

याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी मृताचा भाऊ महादेव सहारे (३१, रा.सावनेर) याच्या तक्रारीवरून अंकुश दामोदर हंबर्डे (३३, सावनेर ता. नांदगाव खंडेश्वर) याच्याविरुद्ध ८ जुलै रोजी रात्री ९.३८ च्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल केला. अवघ्या काही तासात खुनाचा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी अंकुश हंबर्डे याला शनिवारी उशिरा रात्री अटक करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. तू माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतो, यावरून झालेल्या वादावरून अंकुशने आपल्या भावाला कोयत्याने मारून जिवानिशी ठार केल्याची तक्रार मृताचा भाऊ महादेवने नोंदविली. शनिवारी दुपारी आकाशचा मृतदेह चार किमी अंतरावरील खदानीसमोर आढळून आला होता.

त्याच्या सर्वांगावर धारदार शस्त्राने भोसकल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी पंचनामा करत तातडीने मृताची ओळख पटविली. तथा तपासाला वेग दिला. ठाणदेार विशाल पोळकर यांच्या नेतृत्वातील नांदगाव पोलिसांनी अवघ्या सहा तासात तो खून असल्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचून आरोपी हुडकून काढला. यापूर्वी देखील आकाश सहारे व अंकुश हंबर्डे यांच्यात वादावादी झाली होती, असे तपासादरम्यान उघड झाले आहे.

Web Title: Amravati: Why do you look down on your wife? The angry husband killed the young man