शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत विदर्भ 'अ‍ॅडव्हॉन्टेज' परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: August 23, 2014 23:43 IST

पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ अकोला, वाशीम व बुलडाणा या पाच जिल्ह्यांचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी नागपूरप्रमाणेच अमरावती येथे विदर्भ 'अ‍ॅडव्हॉन्टेज' परिषद आयोजित करावी,

अमरावती : पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ अकोला, वाशीम व बुलडाणा या पाच जिल्ह्यांचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी नागपूरप्रमाणेच अमरावती येथे विदर्भ 'अ‍ॅडव्हॉन्टेज' परिषद आयोजित करावी, अशी मागणी तिवसा मतदारसंघाच्या आ. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.अमरावतीत विदर्भ 'अ‍ॅडव्हॉन्टेज' परिषद आयोजित केल्यामुळे विभागातील पाचही जिल्ह्यांचा औद्योगिक विकास होईल. त्या अनुषंगाने आ. ठाकूर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मंत्रालयात भेट घेऊन लक्ष वेधले. नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काही महिन्यांपूर्वी शासनाने टेक्सटाईल झोनकरिता ५०० हेक्टर जागा राखीव ठेवली. मात्र अद्यापही हा प्रकल्प सुरू झाला नाही. युवकांच्या हातालाही काम मिळत नसल्याने येथील युवक मोठ्या संख्येने रोजगारासाठी स्थलांतर करीत आहेत. नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सोई सुविधेसाठी कोट्यवधींचा खर्च केला आहे. येथे आवश्यक सोई-सुविधा असूनही केवळ उद्योगधंदे नसल्यामुळे जनतेमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने उद्योगधंदे सुरू करावे आणि यासाठी अमरावतीत विदर्भ अ‍ॅडव्हॉन्टज परिषद आयोजित करावी, अशी मागणी आ. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेदरम्यान केली.