अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा १५ एप्रिलपासून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 11:32 IST2025-03-19T11:31:39+5:302025-03-19T11:32:34+5:30
Amravati : असे आहे परीक्षांचे वेळापत्रक

Amravati University summer exams from April 15
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२५ परीक्षांना १५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. त्या अनुषंगाने परीक्षा विभागाने नियोजन चालविले असून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. यात सर्व सत्राच्या सम आणि विषम परीक्षांचा समावेश असणार आहे.
अधिसूचना क्रमांक १६/ २०२५ अन्वये उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तर दुसरीकडे परीक्षांर्थ्यांकडून उन्हाळी परीक्षांसाठी आवेदन पत्र मागविले जात आहे. ही कार्यवाही महाविद्यालयांना करावी लागणार आहे. त्यानुसार विद्यापीठाने प्राचार्यांना कळविण्यात आले आहे.
परीक्षा विभागाने प्रकाशित केलेल्या अनुसूचीनुसार विद्या शाखानिहाय १२२ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. सीबीसीएस नवीन, विधी, अभियांत्रिकी, एनईपी पीजी, फार्मसी, कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान शास्त्र, एनईपी यूजी, शारीरिक शिक्षण आदी परीक्षांचा समावेश असणार आहे.
असे आहे परीक्षांचे वेळापत्रक
- १५ एप्रिलपासून पुढे : सत्र पद्धतीमधील सर्व विषम सत्राच्या परीक्षा व वार्षिक पद्धतीमधील परीक्षा
- १९ मेपासून पुढे : सत्र पद्धतीमधील सर्व विषम सत्राच्या परीक्षा, एनईपी (यूजी) सत्र १ परीक्षा व वार्षिक पद्धतीमधील एनएईपी (पीजी)
- १९ जूनपासून पुढे : बी.ए (सीजीएस) सत्र- २, बी.ए. (सीबीसीएस) सत्र -१ आणि सत्र -२, एन.ई.पी. (पीजी) सत्र- ४, एन.ई.पी. (यूजी) सत्र- २ अभ्यासक्रमाच्या परीक्षा तसेच शासनस्तरावर प्रवेश होणाऱ्या अभ्यासक्रमांच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा आदी.
"उन्हाळी परीक्षांमध्ये साधारणतः दीड लाख परीक्षार्थी आवेदन सादर करतात. त्या अनुषंगाने अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील १८३ महाविद्यालयाच्या केंद्रांवर या परीक्षा घेण्यात येतील. तयारी वेगाने केली जात आहे."
- डॉ. नितीन कोळी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अमरावती विद्यापीठ