मुद्रा बँक योजनेसाठी नियुक्त समितीत अमरावतीच्या तिघांचा समावेश, राज्यस्तरीय संनियंत्रण समिती गठित : १६ अशासकीय सदस्य नियुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 17:51 IST2017-10-01T17:51:44+5:302017-10-01T17:51:50+5:30
मुद्रा बँक योजनेची शहरी, ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम, डोंगरी अणि आदिवासी भागात प्रभावीपणे अंमलबजावणी करताना त्याबबतचे संनियंत्रण, समन्वय आणि आढावा घेण्यासाठी नियोजन विभाग शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय सनियंत्रण समितीमध्ये तीन वर्षांकरिता

मुद्रा बँक योजनेसाठी नियुक्त समितीत अमरावतीच्या तिघांचा समावेश, राज्यस्तरीय संनियंत्रण समिती गठित : १६ अशासकीय सदस्य नियुक्त
अमरावती : मुद्रा बँक योजनेची शहरी, ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम, डोंगरी अणि आदिवासी भागात प्रभावीपणे अंमलबजावणी करताना त्याबबतचे संनियंत्रण, समन्वय आणि आढावा घेण्यासाठी नियोजन विभाग शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय सनियंत्रण समितीमध्ये तीन वर्षांकरिता राज्यभरातील १६ अशासकीय सदस्यांची नियुक्ती शासनाने केली आहे. यामध्ये अमरावती येथील तीन सदस्यांचा समावेश आहे.
अमरावतीमधून सदर समितीवर भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी व निवेदिता चौधरी, किरण पातुरकर यांचा यामध्ये समावेश आहे. नागपूर मधून अनिल सोले, जिल्हा परिषद सदस्य रंजीता कोडापे, औरंगाबाद मधुन चंद्रकांत हिवराळे, प्राचार्य रेखा तरडे, नाशिकमध्ये शरद शेळके, पुणेमधून श्रीकांत भारतीय, स्नेहल लोंढे, कोकणातून विनोद शेलार, वर्षा भोसले, तर सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींपैकी बसवराज मंगरूळे( औरंगाबाद), दिलीप कंदकुर्ते ( नांदेड), दिपाली मोेकाशे (ठाणे) आदींचा यामध्ये समावेश असून मुद्रा बँक योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनेक बाबी जनेतकडून उपस्थित केल्या जात आहेत. जिल्हास्तरीवरील समितीकडून सदर योजनेसंदर्भात वेळोवेळी होत असलेल्या कार्यवाहीबाबत संनियंत्रण समन्वय आणि आढावा घेणे आवश्यक असल्याने राज्यस्तरीय मुद्रा बँक योजनेसंदर्भात शासनाने संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीवरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याचे शासनाने ठरविले होते. यासंदर्भाचा शासन निर्णय अवर सचिव प्रियांका छापवाले यांनी शुक्रवारी जारी केला.