शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

अमरावती-पुणे एक्स्प्रेस होणार ‘मेळघाट एक्स्प्रेस’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 5:02 PM

अमरावती ते पुणे एक्स्प्रेस आता ‘मेळघाट एक्स्प्रेस’ या नावाने धावेल. याला केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

परतवाडा (अमरावती) : अमरावती ते पुणे एक्स्प्रेस आता ‘मेळघाट एक्स्प्रेस’ या नावाने धावेल. याला केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अमरावती शहर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्यालय आहे. अमरावतीसह मेळघाटातील लोक पुण्यापर्यंत, तर पुण्याची मंडळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह मेळघाटचे नैसर्गिक सौंदर्य, तेथील लोकजीवन, जैवविविधता बघण्याकरिता, अभ्यासाकरिता याच अमरावती-पुणे एक्स्प्रेसने ये-जा करतात. या एक्स्प्रेस गाडीला दुसरे कुठलेही नाव नाही.

ती केवळ अमरावती-पुणे एक्स्प्रेस या नावानेच धावते. मेळघाटचे महत्त्व अधोरेखित होण्याकरिता याच अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मेळघाट एक्स्प्रेस असे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार आनंदराव अडसूळ यांनी एका पत्राद्वारे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली होती. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचलकांनीही अडसूळ यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाचा उल्लेखही अडसूळ यांनी आपल्या या पत्रात केला आहे. खासदारांच्या या पत्राला रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मेळघाटचे नाव दिल्याबद्दल संबंधित विभागाच्या संचालकांना लेखी कळविले आहे. तसे पत्र खासदारांना प्राप्त झाले आहे.