अमरावती पोलिसांचा ऐतिहासिक ‘सर्जिकल स्ट्राईक’; ३ कोटींचे 'एमडी' ड्रग्ज जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: March 8, 2026 23:59 IST2026-03-08T23:58:49+5:302026-03-08T23:59:16+5:30

Crime News: अमरावती शहराला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पुकारलेल्या मोहिमेला आजवरचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. रविवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक कारवाई करत २ किलो ८० ग्रॅम ‘मेफेड्रोन’ अर्थात एमडी ड्रग्स जप्त केले.

Amravati Police's historic 'surgical strike'; 'MD' drugs worth Rs 3 crore seized | अमरावती पोलिसांचा ऐतिहासिक ‘सर्जिकल स्ट्राईक’; ३ कोटींचे 'एमडी' ड्रग्ज जप्त

अमरावती पोलिसांचा ऐतिहासिक ‘सर्जिकल स्ट्राईक’; ३ कोटींचे 'एमडी' ड्रग्ज जप्त

- प्रदीप भाकरे 
अमरावती - शहराला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पुकारलेल्या मोहिमेला आजवरचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. रविवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक कारवाई करत २ किलो ८० ग्रॅम ‘मेफेड्रोन’ अर्थात एमडी ड्रग्स जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत तब्बल ३ कोटी १ लाख २० हजार रुपये इतकी आहे. पोलिस निरिक्षक संदीप चव्हान यांच्या नेतृत्वातील गुन्हे शाखेने ही दमदार कारवाई केली.

८ मार्च रोजी सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास, गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालखडी ते सुकळी वनारसी रोडवर सापळा रचण्यात आला होता. यावेळी संशयास्पदरित्या आढळलेल्या दोन तरुणांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे अमली पदार्थांचा मोठा साठा मिळून आला. अब्दुल फहीम अब्दुल (वय २५, रा. आझाद नगर, अमरावती) व शेख आयान शेख रमजान (वय २०, रा. द्वारका नगर, अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील अयान हा रेकॉर्डवरील आरोपी असून शहर गुन्हे शाखेने त्याला दोन महिन्यांपुर्वी एमडीसह अटक केली होती. त्यावेळीपासूनच तो गुन्हे शाखेच्या रडारवर होता.

Web Title : अमरावती पुलिस का बड़ा छापा, 3 करोड़ रुपये की एमडी ड्रग्स जब्त

Web Summary : अमरावती पुलिस को बड़ी सफलता मिली, 3 करोड़ रुपये की एमडी ड्रग्स जब्त। नागपुरीगेट के पास एक आदतन अपराधी सहित दो लोगों को गिरफ्तार किया गया। इंस्पेक्टर चव्हाण के नेतृत्व में यह अभियान शहर में ड्रग तस्करी को लक्षित था।

Web Title : Amravati Police Seize ₹3 Crore Worth MD Drugs in Strike

Web Summary : Amravati police achieved a major success, seizing ₹3 crore worth of MD drugs. Two individuals, including a repeat offender, were arrested near Nagpurigate. The operation, led by Inspector Chavan, targeted drug trafficking in the city.