शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत पायरेटेड सीडीजचा व्यापार बहरला !

By admin | Updated: January 7, 2017 00:14 IST

नवीन कुठलाही चित्रपट आला तर चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सहज पायरेटेड सीडीज व डिव्हीडी ग्राहकांना अंबानगरीत सहज उपलब्ध होते.

नियंत्रण नसे कुणाचे : पोलीस कारवाई केव्हा ?संदीप मानकर अमरावतीनवीन कुठलाही चित्रपट आला तर चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सहज पायरेटेड सीडीज व डिव्हीडी ग्राहकांना अंबानगरीत सहज उपलब्ध होते. हा प्रकार नियमबाह्य आहे. या सीडीज कशा काय विक्री करण्यात येतात, हा प्रश्न अंबानगरीतील नागरिकांना पडला आहे. अमरावतीत पायरेटेड सीडीजचा व्यापार मोठ्या प्रमाणात बहरला आहे. अल्पदरात या ठिकाणी पायरेटेड सीडीजची सर्रास विक्री करण्यात येत आहे.पायरेसी सीडीज तयार करून त्या ग्राहकांना विकणे हा कॉपी राईट अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा ठरतो. पायरेटेड सिडीज तयार करून विक्रीचे व या व्यवसायाचे राज्यभर मोठे जाळे पसरले आहे. यातून महिन्याकाटी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करण्यात येत आहे. अंबानगरीतही हे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. अमरावती व बडनेऱ्यात याचे ८ ते १० पायराटेड सीडीजच्या विक्रीची दुकाने आहेत. एखादा चित्रपट रिलीज झाला की, त्या चित्रपटाचे गाणे व त्या चित्रपटाचा हक्क इतर अनेक नामांकित कंपनी विकत घेते. मात्र अधिकृत कंपनीची गाण्याची किंवा चित्रपटाच्या ओरीजनल सीडीज उशिरा मार्केटमध्ये येतात. या व्यवसायात असणारे कुठलाही चित्रपट ज्या दिवशी रॅलीज होतो. त्या चित्रपटाची सीडीज व डिव्हीडी लगेच दुसऱ्या दिवशी पायरेटेड होऊन विक्री कशी होते? चित्रपटाची ओरीजनल सीडीज महाग मिळते. नामांकित कंपनीची ओरीजनल सीडीज २०० ते ५०० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येते. पण हीच पायरेटेट केलेली सीडीज व डीव्हीडी मार्केटमध्ये फक्त २० ते ८० रुपयांपर्यंत विक्रीस येते. अंबानगरीत ह्या सीडीज विकत घेणाऱ्यांचा वर्ग मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानात मोठी गर्दी असते. एका दुकानदाऱ्याचा महिन्याकाठी दीड ते दोन लाख रुपयांच्या पायरेटेड सीडीज, डीव्हीडी विक्री करण्यात येत आहेत. याच जिल्ह्यातील विक्री महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांच्या घरात जात आहे. जतस्तंभ चौक, जुने कॉर्टन मार्केट, ईतवारा, बडनेरा या भागात पायरेटेड सीडीजची सर्रास विक्री करण्यात येत आहे. ज्या अधिकृत कंपनीच्या कंपनीनेने प्रदर्शित होणारे चित्रपटांच्या ओडीओ व व्हिडीओ, व चित्रपटांच्या सीडीज ज्या पायरेटेट पद्धतीने मार्केटमध्ये कमी पैशात विक्री करण्यात येत आहे. त्या दुकानदारांवर कारवाई व्हायलाच हवी. अधिकृत कंपनीने नेमलेल्या स्थानिक एजंटने अशा पायरेटेड सीडी जची विक्री करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली असल्यास अशा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. अश्लील फिल्मस्च्या सीडीजही वापरातअंबानगरीत महाविद्यालयीन तरुणांमध्ये अश्लील चित्र पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. काही तरुण तर सत्त इंनटनेटचा वापर करून अशा फिल्मस डाऊनलोड करतात. पण आता पेनेड्रायईव्ह व मोबाईलमध्ये काही सीडीज विक्रीच्या सेंटरमध्ये काही पैेसे देऊन ह्या अश्लील फिल्म डाऊनलोड करून देण्यात येतात. हा व्यापारही अधिक पसरला आहे. यातून तरुणवर्ग बिघडत चालले आहे. अश्लील चित्रुटाच्या सीडीज विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. त्यांनी अशा केंद्रांवर धाडी टाकून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. डाऊनलोड करून विक्रीतरुणांमध्ये सध्या मोबाईल किंवा सीडीजमध्ये डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. कुठल्याही चित्रपटांची निर्मिती झाल्यानंतर मोबाईलमध्ये असलेल्या काही म्हत्त्वाच्या अ‍ॅपस्मधून कुठलाही चित्रपट इंटरनेटची सेवा वापरून डाऊनलोड करू शकतो. त्यामुळे ट्रांरन्टअ‍ॅपसवरूनही मोठ्या प्रमाणात चित्रपट डाऊलोड करून त्याच्या पायरेटेड सिडीज तयार करण्याचा गौरखधंदा वाढला आहे. याचा व्यापार मोठा असून फक्त २० ते ४० रुपयांमध्ये कुठल्याही नवीन चित्रपटांची पायरेटेड सीडीज सहज उपलब्ध होत आहे. ज्या अधिकृत कंपनीकडे याचे हक्क व अधिकार दिला आहे. त्यांचे स्थानिक एजंट अंबानगरीत आहेत. त्या कंपनीच्या सीडीज पायरेटेड केल्या जात असतील तर त्यांनी असा अवैध व्यापार करणाऱ्यांच्या तक्रारी संबंधित विभागाकडे करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सीडीज पायरेटेड होत असेल तर अधिकृत कंपनीचे नेमलेल्या प्रतिनिधींनी आमच्याकडे तक्रार करावी व अश्लिल चित्रपटाचा व्यापार होत असेल तर माहिती घेऊन धाडी टाकू. - मिलींद पाटील, एसीपी, राजापेठ, अमरावती