रविवारपासून अमरावती-मुंबई विमानाच्या वेळेत बदल; आता आठवड्यातून चार दिवस फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:55 IST2025-10-25T19:55:07+5:302025-10-25T19:55:30+5:30

Amravati : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ ठरले, विमानतळाने ३८९ हेक्टर क्षेत्र व्यापले. १८५० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदीची धावपट्टी आहे.

Amravati-Mumbai flight timings changed from Sunday; Now there will be four flights a week | रविवारपासून अमरावती-मुंबई विमानाच्या वेळेत बदल; आता आठवड्यातून चार दिवस फेरी

Amravati-Mumbai flight timings changed from Sunday; Now there will be four flights a week

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
येथील विमानतळावरून अलायन्स एअर लाईनच्या अमरावती ते मुंबई विमान सेवेच्या वेळेत बदल होणार असून रविवार, २६ ऑक्टोबरपासून सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी विमान मुंबईकडे झेपावणार आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे चार दिवस आठवड्यातून मुंबईसाठी विमान सेवा असणार आहे. त्याअनुषंगाने अलायन्स एअर लाईनच्या संकेतस्थळावर वेळेत बदल करण्यात आले आहे. मात्र रविवारी मुंबईकडे जाण्यासाठी तिकीट उपलब्ध नसून आरक्षण हाऊसफुल्ल आहे. तर मुंबईहून अमरावतीत येण्यासाठी केवळ दोन तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी दिसून आले. 

नाईट लैंडिंग सुविधा उभारण्याचे काम सुरू

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ ठरले, विमानतळाने ३८९ हेक्टर क्षेत्र व्यापले. १८५० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदीची धावपट्टी आहे. सध्या नाईट लैंडिंग सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. अमरावती विमानतळाहून हल्ली अलायन्स एअरची एटीआर ७२ मुंबई विमानसेवा सुरू आहे. 

असे असेल नवे वेळापत्रक

मुंबई ते अमरावती सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी टेकऑफ होईल. अमरावती विमानतळावर सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी लैंडिंग होईल. अमरावती ते मुंबई सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी टेकऑफ होईल. मुंबई विमानतळावर सकाळी ११ वाजता लैंडिंग होईल. वेळापत्रक बदलानंतर पहिल्याच दिवशी मुंबईकडे प्रवासाचे तिकीट हाऊसफुल्ल आहे.

"अमरावती-मुंबई विमानसेवेच्या वेळेत २६ ऑक्टोबरपासून बदल होत आहे. आठवड्यातून चार दिवस विमानसेवा असेल. अलायन्स एअरने संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर केले आहे. नवीन वेळेनुसार विमानांचे टेकऑफ, लैंडिंग होईल."
- राजकुमार पटेल, प्रबंधक, अमरावती विमानतळ.

Web Title : रविवार से अमरावती-मुंबई विमान के समय में बदलाव; सप्ताह में चार दिन उड़ान

Web Summary : अमरावती-मुंबई विमान के समय 26 अक्टूबर से बदल रहे हैं। उड़ानें सप्ताह में चार दिन: सोमवार, बुधवार, शुक्रवार और रविवार को संचालित होंगी। पहला रविवार पहले से ही पूरी तरह से बुक है। अमरावती हवाई अड्डे पर रात्रि लैंडिंग सुविधा का निर्माण कार्य चल रहा है।

Web Title : Amravati-Mumbai Flight Timings Change From Sunday; Four Days a Week

Web Summary : Amravati-Mumbai flight timings change from October 26th. Flights will operate four days a week: Monday, Wednesday, Friday, and Sunday. The first Sunday is already fully booked. Night landing facility construction is underway at Amravati Airport.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.