शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

 अमरावती विभागात ८१३ गावे गारपिटीने बाधित, चार व्यक्तींसह १२ गुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:07 IST

विभागात रविवारी सकाळी झालेल्या वादळासह गारपीट व  अवकाळी पावसामुळे ८१३ गावांमध्ये किमान ८० हजार हेक्टरमधील रबी व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आपत्तीमध्ये वीज अंगावर पडून चार व्यक्ती व १२ गुरांचा मृत्यू झाला.

अमरावती - विभागात रविवारी सकाळी झालेल्या वादळासह गारपीट व  अवकाळी पावसामुळे ८१३ गावांमध्ये किमान ८० हजार हेक्टरमधील रबी व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आपत्तीमध्ये वीज अंगावर पडून चार व्यक्ती व १२ गुरांचा मृत्यू झाला. चार व्यक्ती जखमी झाले आहेत. मात्र, यंत्रणाद्वारा सर्वेक्षण अद्याप सुरू झालेले नाही. विभागात रविवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटमुळे सर्वाधिक ३८८ गावांमध्ये बुलडाणा जिल्ह्यात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात ३८४, अकोला ३१ व वाशिम जिल्ह्यात १० गावांमध्ये नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली तरी नुकसान मात्र फारसे झालेले नसल्याचा अहवाल आहे. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान रबीच्या गहु व हरभºयाचे झाले. शेतकºयांनी तुरीची सवंगणी करून ढीग लावले होते, ते ओले होऊन नुकसान झाले. झाडावरील कापूस ओला झाला. कांद्यासह भाजीपाला पिकांचेही प्रचंड नुकसान झाले. संत्र्याच्या मृग बहराची फळगळ झाली, तर आंबिया बहराचे प्रचंड नुकसान झाले. या सर्व जिल्ह्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन पीकविमा कंपन्यांसोबत बैठक घेण्याच्या सूचना कृषी मंत्र्यांनी दिल्या आहेत. बाधित क्षेत्राच्या सर्वेक्षणाचे आदेश दिल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले असले तरी यंत्रणेद्वारा प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येऊन नुकसानीचा अंदाज वर्तविला. मात्र, प्रत्यक्ष सर्वेक्षणाला अद्यापही सुरूवात झालेली नाही.

 तीन जणांचा मृत्यू  वाशिम जिल्ह्यात महागाव येतील यमुनाबाई हुंभाड (७५) बुलडाणा जिल्ह्यात गिरोली येथे निकिता राठोड (१६) अमरावती जिल्ह्यात नायगाव येथे गंगाधर राठोड (७३) यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर बुलडाणा जिल्ह्यात वळती येथे रस्त्यावरील झाड अंगावर पडून ज्ञानगंगापूर येथील अजय महाले गंभीर जखमी झाल होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मेहकर येथे दोन, संग्रामपूर येथे तीन, वरूड येथे सात अशा एकूण १२ गुरांचा वीज कोसळून मृत्यू झाला.

टॅग्स :RainपाऊसAmravatiअमरावती