अमरावती, दर्यापूर बाजार समिती होणार ‘आॅनलाईन’
By Admin | Updated: March 31, 2017 00:10 IST2017-03-31T00:10:08+5:302017-03-31T00:10:08+5:30
शेतमालास देशपातळीवरील बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाच्या आॅनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार (ईनाम)

अमरावती, दर्यापूर बाजार समिती होणार ‘आॅनलाईन’
दुसरा टप्पा : धामणगावात ‘ई-मंडी’ कार्यान्वित
अमरावती : शेतमालास देशपातळीवरील बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाच्या आॅनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार (ईनाम) योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३० हजार समितींचा समावेश करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील अमरावती व दर्यापूर बाजार समितीचा समावेश आहे. यापूर्वी अचलपूर समिती आॅनलाईन झाली आहे तर धामणगाव समितीचा ‘ई-मंडी’ योजनेत समावेश झाला आहे.
शेतमालविक्रीत होणारी मध्यस्थी थांबविणे, हा याप्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी केंद्र सरकारने मागीलवर्षी ‘ई-नाम’ योजना सुरू केली. पहिल्या टप्प्यात ३० बाजार समितींचा समावेश आहे. यामध्ये अचलपूर समितीचा समावेश असल्याचे सहकार विभागाने सांगितले. मागील वर्षी जाहीर झालेल्या बाजार समितींना प्रत्येकी ३० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. आॅनलाईन लिलावाच्या तांत्रिक साधनसामग्रीसाठी हा निधी वापरला जाणार आहे. एप्रिल महिन्यात हे तांत्रिक साहित्य बाजार समितींना मिळणार असून नंतर आॅनलाईन लिलावप्रक्रिया सुरू राहिल, असे कृषी पणन् मंडळाने सांगितले.