अमरावती : कैद्याला न्यायालय परिसरात गांजा देणा-या नागपूरच्या तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 16:09 IST2018-02-13T16:08:38+5:302018-02-13T16:09:21+5:30
कारागृहातील कैद्याला गांजा पुरविणा-या नागपूरच्या एका तरुणास गाडगेनगर पोलिसांनी न्यायालय परिसरातून ताब्यात घेतले.

अमरावती : कैद्याला न्यायालय परिसरात गांजा देणा-या नागपूरच्या तरुणाला अटक
अमरावती : कारागृहातील कैद्याला गांजा पुरविणा-या नागपूरच्या एका तरुणास गाडगेनगर पोलिसांनी न्यायालय परिसरातून ताब्यात घेतले. कपिल भाऊराव देवगडे ( रा. नेहरू कॉलनी, पोलीस लाइन, टाकळी, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे.
अमरावती पोलीस मुख्यालयातील एएसआय अशोक गिरी यांच्या पोलीस पथकाने तुरुंगातून काही आरोपींना न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, न्यायालय परिसरातच आरोपी कपिल देवगडे हा एका कैद्याला तीन ग्रॅम (६० रुपये) गांजा देण्यासाठी आला. पोलिसांनी कपिलची झडती घेतली असता, त्याच्याजवळ गांजा आढळून आला. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध एडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष तोकलवाड करीत आहेत.