अमरावतीमध्ये ४७ पॉझिटिव्ह, एकूण कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ९६१  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 20:59 IST2020-07-13T20:58:11+5:302020-07-13T20:59:04+5:30

चौघांचा मृत्यू, मृतांची संख्या ३४

In Amravati, 47 positive, total coronary heart disease patients 961 | अमरावतीमध्ये ४७ पॉझिटिव्ह, एकूण कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ९६१  

अमरावतीमध्ये ४७ पॉझिटिव्ह, एकूण कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ९६१  

ठळक मुद्देचौघांचा मृत्यू, आजपर्यंतच्या एकूण मृतांची संख्या ३४

अमरावती : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा ४७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने  कोरोनाग्रस्तांमची संख्या ९६१ वर पोहोचली आहे. दिवसभरात चौघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३४ झालेली आहे. 

विद्यापीठ लॅबद्वारा प्राप्त अहवालात अतुलनगरातील २६ वर्षीय, एलआयसी कॉलनीत ४९ वर्षीय, अंजनगाव सुर्जीत ६५ वर्षीय, संजय गांधी नगरात २१ वर्षीय, राजूरा बाजार येथे २६ वर्षीय व ४८ वर्षीय, भारतनगरात ४३ वर्षीय, शेगाव नाका येथे ३० वर्षीय, मांगीलाल प्लाट येथे १९ वर्षीय, बिच्छू टेकडी येथे ५० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. श्रीरामनगरात २७ वर्षीय, वलगाव येथे ५३ वर्षीय, गाडगेनगर, सुकळी, हनुमान नगरात प्रत्येकी २५ वर्षीय, शेगाव नाका येथे ६८ वर्षीय, प्रियंका कॉलनीत ४५ वर्षीय, छत्रसाल नगरात १६ वर्षीय, गुरुकृपा कॉलनीत ४९ वर्षीय, दर्यापूर येथे ४५ वर्षीय, सिद्धार्थ नगरात ४६ वर्षीय, वाकी- रायपूर येथे ३० वर्षीय, वल्लभनगरात २० वर्षीय, वडाळी ३०, अंबाकॉलनीत ५५ वर्षीय, सराफा लाईन येथे ३० वर्षीय, अचलपूरला ५० वर्षीय, मोर्शी व यशोदानगरात ४० वर्षीय, माधन नगरात ४४ वर्षीय,  बिच्छू टेकडी येथे ४९ वर्षीय व चांदूर रेल्वे येथे ५८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

सायंकाळच्या अहवालात अंजनगाव सुर्जी येथील ५० वर्षीय,श्रीकृष्ण पेठ येथे ३३ वर्षीय, श्रीकृष्ण पेठ येथे २३ वर्षीय, पंजाबराव कॉलनीत २० व ५३ वर्षीय,   शेगाव नाका येथे ६२ वर्षीय, राहुलनगरात ४९, ५४ व ५९ वर्षीय, बिच्छूटेकडी येथे ३२ वर्षीय पुरुष व श्रीकृष्ण पेठ २५ वर्षीय, नंदनवन कॉलनीत ४५ वर्षीय, अप्पर वर्धा कॉलनीत १३ वर्षीय बालिका व १८ वर्षीय तरुणी तसेच अशोकनगरात ५२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
१९ जूनला पॉझिटिव्ह आलेली साबनपुरा येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ८ जुलै रोजी पॉझिटिव्ह आलेल्या चपराशीपुºयातील ७० वर्षीय व्यक्तीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला, प्रवीणनगरातील ५५ वर्षीय महिला व चांदूरबाजार तालुक्यातील थुगाव ५२ वर्षीय व्यक्तींचा सारीने निधन झाले मात्र त्यांचा सोमवारी पॉझिटिव्ह अहवाल आल्याने मृतांची संख्या ३४ झालेली आहे.
 

Web Title: In Amravati, 47 positive, total coronary heart disease patients 961

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.