शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तापमानामुळे आंबिया बहाराला गळती !

By admin | Updated: April 12, 2017 00:42 IST

वाढते तापमान व खालावलेली भूजल पातळी यामुळे आंबिया बहराला गळती लागली आहे.

संत्राबागांची अवस्था बिकट : २०० ते ४०० रुपये तासाप्रमाणे घ्यावे लागते पाणीवरूड : वाढते तापमान व खालावलेली भूजल पातळी यामुळे आंबिया बहराला गळती लागली आहे. परिणामी तालुक्यातील संत्रा बागाईतदारांची अवस्था बिकट झाली आहे. वरूड तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रात संत्राझाडे आहेत. मागील वर्षी मृग बहर उत्तम होता. मात्र, उत्पादन जास्त झाल्याने संत्र्याला बाजारपेठांत योग्य भाव मिळत नव्हता. अखेरच्या टप्प्यात शेतकऱ्यांना संत्रा रस्त्याच्या कडेला फेकण्याची वेळ आली होती. जिल्ह्यातील सर्वच मोठ्या बाजारपेठांत संत्र्यांचे ढिगारेलागले होते. यामुळे आंबिया बहर चांगला आल्यास झालेले नुकसान भरून काढता येईल, अशी आशा संत्रा बागायतदारांना होती. दरम्यान, संत्रा आंबिया बहाराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाई निर्माण झाली. वरूड तालुक्यातील विहिरी आटू लागल्या आहेत. भूजल पातळी खालवल्याने बोअर बंद पडले. सिंचन प्रकल्पामध्ये केवळ १० ते १५ टक्केच जलसाठा आहे. यामुळे पाणी वापर संस्थाना पाणी देणे बंद झाले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अतितापमानामुळे व खालावलेल्या भूजल पातळीमुळे संत्राबागा वाचविणे कठीण झाले आहे. संत्रा बागायतदार २०० ते ४०० रुपये प्रती तास याप्रमाणे पाणी उपसा करीत आहेत. पाणी मिळेल त्यावेळी बागांना सिंचन केले जात आहे. तालुक्यात वाढलेल्या जलसंकटाचा सर्वाधिक फ टका संत्रा बागाईतदारांना बसला आहे. तालुक्यात भूजल पातळी वाढावी यासाठी कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग, लघु मध्यम सिंचन प्रकल्प तयार केले आहेत. मात्र मार्च महिन्यानंतर भूजल पातळी खालावली. यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माणन झाला. (तालुका प्रतिनीधी)