विद्यार्थिनीला बेदम मारहाण करणाऱ्या अजिंक्यला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST2019-08-24T06:00:00+5:302019-08-24T06:00:46+5:30
विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला बेदम मारहाण करणारा आरोपी अजिंक्य सिनकर याला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रविनगरातून अटक केली. घटनेनंतर तो यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे त्याच्या घरी गेला होता. प्रेमप्रकरणातून हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

विद्यार्थिनीला बेदम मारहाण करणाऱ्या अजिंक्यला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला बेदम मारहाण करणारा आरोपी अजिंक्य सिनकर याला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रविनगरातून अटक केली. घटनेनंतर तो यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे त्याच्या घरी गेला होता. प्रेमप्रकरणातून हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात एका विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याच्या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली होती. महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये या घटनेमुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, घटनेनंतर पसार झालेल्या अजिंक्यचा शोध गाडगेनगर पोलीस घेत होते. पोलीस आपल्या मागावर असतील, या भीतीपोटी तो यवतमाळ जिल्ह्यातील महागावला गेला होता. पोलिसांनी अंजिक्यच्या वडिलांशीही संपर्क करून त्याची माहिती घेतली. यादरम्यान पोलिसांनी अजिंक्यच्या मित्रांची चौकशी केली. अजिंक्य न्यायालयात येणार असल्याचे पोलिसांना कळले होते. तत्पूर्वी, तो रविनगरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी अजिंक्यच्या मित्राला विश्वासात घेऊन त्याच्याशी संपर्क साधावयास लावला. त्याला अमरावतीत बोलावून घेतले. त्यानंतर पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोकुल ठाकूर, पोलीस हवालदार अहमद अली, भारत वानखडे, प्रशांत दि. वानखडे, प्रशांत व. वानखडे यांनी रविनगर परिसरात सापळा रचून अजिंक्य सिनकरला ताब्यात घेतले. गाडगेनगर पोलिसांनी त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अजिंक्यला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आरोपी अजिंक्य यवतमाळ जिल्ह्यातील महागावला त्याच्या घरी गेला होता. त्याच्या मित्रांना विश्वास घेऊन त्याच्याबाबत माहिती काढली. यानंतर अमरावतीला बोलावून रविनगरातून अटक केली.
- मनीष ठाकरे
पोलीस निरीक्षक, गाडगेनगर.