शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

एआयएसएफने अडविला शिक्षणमंत्र्यांचा ताफा, १२ विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 17:55 IST

सरकारी शाळांचे खासगीकरण व कंपनीकरण करण्याच्या शासननिर्णयाच्या विरोधात बुधवारी आॅल इंडिया स्टुंडट्स फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी अंबिकानगरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखविले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आल्याने पोलिसांची चांगलीच ताराबंळ उडाली. 

अमरावती : सरकारी शाळांचे खासगीकरण व कंपनीकरण करण्याच्या शासननिर्णयाच्या विरोधात बुधवारी आॅल इंडिया स्टुंडट्स फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी अंबिकानगरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखविले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आल्याने पोलिसांची चांगलीच ताराबंळ उडाली.     फे्रजरपुरा पोलिसांनी १२ विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३४१ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविला. शिक्षणमंत्री विनोद तावडे बुधवारी अमरावती दौ-यावर आले होते. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख जयंती कार्यक्रम आटोपून त्यांचा ताफा  महापालिका शाळेला भेट देण्यासाठी अंबिकानगर मार्गे निघाला होता. एआयएसएफचे जिल्हाध्यक्ष हिमांशू अतकरे यांच्या नेतृत्वात संदीप ढोणे, धीरज बनकर, अजिंक्य ढोके, ऐश्वर्या चुनडे, मनीषा कांबळे, सूरज मोने, मयूर राठोड, अमोल देवळेकर, अक्षय गायगोले, अतुल मानतकर, सुमीत कोरे आदींनी अंबिकानगरातील गणपती मंदिराजवळ शिक्षणमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. ‘शिक्षण खाते विनोद तावडे यांच्या तावडीत असला तरी, शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही’ अशी घोषणाबाजी करून विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळाबंदीचा निषेध नोंदविला. शिक्षणमंत्र्यांनी त्यांचे वाहन थांबवून समस्या ऐकून घेतल्या व निवेदन सादर करण्यास सांगितले. याप्रकरणी फे्रजरपुरा पोलिसांनी १५ युवकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

बियाणी चौकातील निषेध फसलाएआयएसएफचे कार्यकर्ते बियाणी चौकात शिक्षणमंत्र्यांचा ताफा अडविणार होते. मात्र, येथे पोलिसांचा ताफा होता. संधी पाहून अंबिकानगरात ताफा अडवला गेला. 

राज्य सचिव पोलिसांच्या ताब्यातएआयएसएफ राज्य सचिव सागर दुर्याेधन यांना फे्रजरपुरा पोलिसांनी बुधवारी सकाळीच ताब्यात घेतले. त्यांना पूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे