वैतागलेल्या नागरिकांची अभियंत्यावर आगपाखड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:30 PM2017-12-21T23:30:16+5:302017-12-21T23:30:29+5:30

शिवाजीनगर भागात तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या सिमेंटरोड बांधकामामुळे वैतागलेल्या नागरिकांचा आणि व्यावसायिकांच्या संयमाचा गुरुवारी बांध फुटला नि शाखा अभियंत्याला सामान्यजनांच्या रौद्ररुपाला सामोरे जावे लागले.

Agapagand on the engineers of the waived | वैतागलेल्या नागरिकांची अभियंत्यावर आगपाखड

वैतागलेल्या नागरिकांची अभियंत्यावर आगपाखड

Next
ठळक मुद्देजीवघेणा सिमेंटरोड : कार्यकारी अभियंत्याने केली पाहणी, नियोजनाचा अभाव असल्याचे मान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिवाजीनगर भागात तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या सिमेंटरोड बांधकामामुळे वैतागलेल्या नागरिकांचा आणि व्यावसायिकांच्या संयमाचा गुरुवारी बांध फुटला नि शाखा अभियंत्याला सामान्यजनांच्या रौद्ररुपाला सामोरे जावे लागले.
त्याचे झाले असे की, दीर्घ कालावधीच्या बांधकामासाठी बारीकसारीक नियोजन आवश्यक ठरते. तथापि, सिमेंटरोडच्या या निर्मितीदरम्यान सामान्यजनांना उद्भवणाºया अडचणींना पर्याय उपलब्ध करून देण्याचे मुळीच नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हा स्टेडियममध्ये जा-ये करणारे आणि जिल्हा स्टेडियम संकुलातील गाळेधारक यांचा रस्ताच सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद करून टाकला. उड्डाणपुलापासून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनापर्यंतचा परिसर रस्तानिर्मितीसाठी ताब्यात घेण्यात आला. हा ताबा घेऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला. मात्र, काम कासवगीतने सुरू आहे. यादरम्यान जिल्हा स्टेडियममध्ये खेळादी कार्यासाठी येणाºया लोकांनी मिळेल ते मार्ग काढले. कुणी अर्धवट फुटपाथहून, तर कुणी बांधकामस्थळाहून ये-जा करू लागले. या प्रकारात रोज किरकोळ अपघातांची मालिका सुरू झाली. न थांबणारी ही मालिका अध्येमध्ये घडणाऱ्या गंभीर अपघातांमुळे चिंताजनक आणि चीड आणणारी ठरली. गुरुवारी एका इसमाचा गंभीर अपघात झाला. मृत्यूच्या दाढेत विसावताना तो बचावला. दुसऱ्या एका तरुणाची नवी कोरी दुचाकी आडवीतिडवी पडली. दोघांच्या संतापाला यापूर्वी असाच अनुभव आलेल्यांची जोड मिळाली. जत्था एकत्र झाला. बांधकामस्थळी कार्यरत असलेल्या शाखा अभियंता श्रीकृष्ण गोमकाळे यांच्या दिशेने झेपावला.
आमचा रस्ता बंद करणारे तुम्ही कोण? आमचे जीव घेणार काय तुम्ही? आमचे नुकसान तुम्ही भरून देणार काय? नको आम्हाला तो रस्ता! अशा प्रश्नांची सरबत्ती होऊ लागली. संताप चढत गेला. नको त्या शब्दांमध्ये तो रुपांतरित झाला नि सारी आगपाखड त्या शाखा अभियंत्यांवर निघाली. वेळीच स्थिती सावरल्याने अनर्थ टळला.
त्रुटी सुधारा, शेंडगे यांचे आदेश
या घटनेनंतर सायंकाळी कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांनी बांधकामस्थळाची पाहणी केली. 'लोकमत'ने हा मुद्दा सुरुवातीपासून तंत्रशुद्धरीत्या उचलून धरल्याने 'लोकमत'कडून बांधकाम आणि नियोजनातील उणिवा समजून घेतल्या. तासभराच्या सर्व्हेक्षणानंतर नियोजनात गंभीर उणिवा आणि त्रुटी असल्याचे शेंडगे यांनी मान्य केले. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. यावेळी मिलिंद पाटणकर उपस्थित होते.

Web Title: Agapagand on the engineers of the waived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.