शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा चार : मसानगंज नवा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST

मसानगंज भागात २९ एप्रिलला ६४ वर्षीय व्यक्ती कोरोनाची पहिला संक्रमित होती. त्यानंतर ८ मे रोजी दुसऱ्या बाधिताची नोंद झाली. ५३ वर्षीय संक्रमित उपचारादरम्यान दगावला. यानंतर मसानगंज भागात सातत्याने कोरोनाचे संक्रमित व्यक्ती निष्पन्न होत आहेत. नंतरच्या दहा दिवसांत कोरोनाचे १२ संक्रमित व्यक्ती या भागात आढळल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देमसानगंज २, रतनगंज १, ताजनगर १ : जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील मसानगंज कंटेनमेंटमध्ये एकूण १३ संक्रमित आहेत. यापैकी दहा दिवसांत १२ संक्रमितांची नोंद झाली. जिल्ह्यात सद्यस्थितीत मसानगंज भागात सर्वाधिक बाधित व्यक्ती समोर येत असल्याने हा भाग कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. या भागातील नागरिकांचे आरोग्य पथकाला सहकार्य मिळत असल्याने अधिकाधिक चाचण्या होणे महत्त्वाचे आहे.मसानगंज भागात २९ एप्रिलला ६४ वर्षीय व्यक्ती कोरोनाची पहिला संक्रमित होती. त्यानंतर ८ मे रोजी दुसऱ्या बाधिताची नोंद झाली. ५३ वर्षीय संक्रमित उपचारादरम्यान दगावला. यानंतर मसानगंज भागात सातत्याने कोरोनाचे संक्रमित व्यक्ती निष्पन्न होत आहेत. नंतरच्या दहा दिवसांत कोरोनाचे १२ संक्रमित व्यक्ती या भागात आढळल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. या भागात ११ मे रोजी तीन महिला व एक पुरुष, १५ मे रोजी ६० वर्षीय व्यक्ती, १६ मे रोजी ४८ वर्षीय पुरुष, १७ मे रोजी ३० वर्षीय तरुण व ५५ वर्षीय महिला, १८ मे रोजी २२वर्षीय तरुण व १९ मे रोजी ४५ व ५० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने संक्रमितांची संख्या १३ झाली आहे.जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी मंगळवारी संयुक्त पाहणीदरम्यान येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक राजेश साहू, सहायक आयुक्त योगेश पिठे, नागपुरी गेटचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे आदी उपस्थित होते.पथकांच्या गृहभेटीकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने मसानगंज भागात आरोग्य विभागाच्या पथकांकडून गृहभेटी दिल्या जात आहेत. या पथकांचा आढावा सहायक आयुक्त योगेश पिठे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे घेत आहेत. अग्निशमन विभागाच्या माध्यमातून या भागात सॅनिटायझेशन करण्यात आले.कोरोनाग्रस्तांची संख्या ११५विद्यापीठाचे प्रयोगशाळेद्वारा मंगळवारी प्राप्त अहवालानुसार मसानगंज कंटेनमेंटमध्ये ४५ व ५० वर्षीय, ताजनगरला ३८ वर्षीय व रतनगंज या नव्या भागात ६० वर्षीय महिलेचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या आता ११५ वर पोहोचली आहे. यामध्ये १३ मृत, कोरोनामुक्त ६३ व ४० रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाधिताचे घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले व संपर्कातील व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी