पंधरा दिवसांनी परतले; शक्तिप्रदर्शनादरम्यान आ. रवी राणांना आली भोवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 06:58 IST2022-02-25T06:58:03+5:302022-02-25T06:58:14+5:30
Ravi Rana : महापालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरणात ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल असलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे १५ दिवसांनंतर गुरुवारी शहरात दाखल झाले.

पंधरा दिवसांनी परतले; शक्तिप्रदर्शनादरम्यान आ. रवी राणांना आली भोवळ
अमरावती : महापालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरणात ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल असलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे १५ दिवसांनंतर गुरुवारी शहरात दाखल झाले आणि त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र, उपस्थितांना संबाेधित करताना राणांना अचानक भोवळ आली. लगेच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळाने त्यांना सुटी देण्यात आली.
येथील इर्वीन चौकात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत फुलांचा वर्षाव करून युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पोलिसांच्या नोंदीत आमदार राणा हे पसार आहेत. मात्र, मी पसार नाही तर दिल्ली येथे कामानिमित्त असल्याचा दावा करणारे राणा यांनी गुरुवारी शहरात दमदार एन्ट्री केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. त्यांचे औक्षण करून स्वागत झाले. त्यानंतर राणा हे कार्यकर्त्यांसह पायदळ रॅलीद्धारे जयस्तंभ चौकाकडे निघाले. येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले.