लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कॅम्प स्थित भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या टॉवरवर तरुण चढल्याने मंगळवारी प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला. टॉवरवर चढलेल्या नीलेश भेंडेचे हे अभिनव आंदोलन मीडियावर व्हायरल झाले अन् प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.कॅम्प रोडवरील हे दृश्य बघण्यासाठी या मार्गाने ये-जा करणारी मंडळी टक लावून टॉवरकडे पाहत होती. उंचच उंच टॉवरवर चढलेला नीलेश भेंडे जमिनीवरून एका ठिपक्यासारखा दिसत होता. टॉवरच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी असताना, बाहेरील मुख्य रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आपत्कालीन पथक, अग्निशमन दलाची वाहने व पोलिसांची वाहने रस्त्यावर लागल्याने या घटनेला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले होते.एकीकडे टॉवरवर चढलेल्या नीलेशला खाली उतरविण्यासाठी राजकीय पदाधिकारी त्याची समजूत घालत होते. दुसरीकडे त्याची मागणी पूर्ण करण्याच्या हेतूने पोलीसही खा. अडसुळांच्या संपर्कात होते. गर्दी वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी टॉवरकडे जाणारे प्रवेशद्वारच बंद केले. आत काय सुरू आहे, याची प्रचंड उत्सुकता बाहेरच्यांना होती. त्यामुळे आपसूकच कोणी भिंतीवरून डोकावून पाहत होते, तर कुणी इमारतीवर चढून पाहण्याचा प्रयत्न करीत होते. रस्त्यावर वाहनांची गर्दी असल्याने ये-जा करणारी प्रत्येक व्यक्ती ‘काय झाले?’ असे विचारल्याशिवाय पुढे जात नव्हती. नीलेश सकाळी ८ ते सायंकाळी ४.३० पर्यंत टॉवरवर असल्यामुळे कॅम्प रोडवर दिवसभर गर्दी बघायला मिळाली. या आंदोलनाची जिल्हाभरात मोठी चर्चा होती.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने बोलविल्या फोमच्या गाद्याश्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्यासह संजय तीरथकर कॅम्प स्थित टॉवर परिसरात पोहोचले. त्यांनी नीलेशला समजाविण्याचे बरेच प्रयत्न केले. घटनेचे गांभीर्य व नीलेश कधीही उडी घेऊ शकतो, याची शक्यता पाहता, वैद्य यांनी तात्काळ हव्याप्र मंडळातील फोमच्या गाद्या बोलावून घेतल्या. नीलेशने उडी घेतली तरी तो गादीवर पडेल, यानुसार गाद्या ठेवण्यात आल्या. मात्र, नीलेश भेंडेची मागणी पूर्ण झाल्याने तो सुखरूप टॉवरवरून खाली आला.बीएसएनएल अधिकारी पोहोचलेटॉवरवर तरुण चढल्याच्या माहितीवरून बीएसएनएलचे सहायक महाप्रबंधक एस.एच. गांधी व कॅम्प येथील उपमंडलीय अधिकारी जी.एस. किनगे यांच्यासह अधिकारी टॉवरजवळ पोहोचले. टॉवर परिसरात बीएसएनएलचे बिल काऊंटर व कर्मचारी निवासदेखील आहेत. त्यामुळे आत येण्याची प्रत्येकाला मुभा असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘तो’ टॉवरवर चढल्याने प्रशासनाची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:48 IST
कॅम्प स्थित भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या टॉवरवर तरुण चढल्याने मंगळवारी प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला. टॉवरवर चढलेल्या नीलेश भेंडेचे हे अभिनव आंदोलन मीडियावर व्हायरल झाले अन् प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.
‘तो’ टॉवरवर चढल्याने प्रशासनाची दमछाक
ठळक मुद्देबघ्यांची प्रचंड गर्दी : सोशल मीडियावर नीलेश भेंडेचे अभिनव आंदोलन ‘व्हायरल’