रेशन कार्डधारकांच्या धान्यावर प्रशासनाची टाच; नोकरदार घेत आहेत मोफत धान्याचा लाभ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 19:43 IST2026-02-25T19:42:41+5:302026-02-25T19:43:16+5:30
Amravati : मिशन सुधार योजनेंतर्गत राज्य शासनाने जिल्हा पुरवठा विभागाला ३९,९५९ लाभार्थ्यांची पडताळणीसाठी दिली होती. पहिल्या यादी टप्प्यात पडताळणीत जिल्ह्यात १३ हजार ४५६ नोकरदार मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले आहे.

Administration's crackdown on ration card holders' food grains; Are employees taking advantage of free food grains?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मिशन सुधार योजनेंतर्गत राज्य शासनाने जिल्हा पुरवठा विभागाला ३९,९५९ लाभार्थ्यांची पडताळणीसाठी दिली होती. पहिल्या यादी टप्प्यात पडताळणीत जिल्ह्यात १३ हजार ४५६ नोकरदार मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले आहे. पुरवठा विभागाने या लाभार्थ्यांचा रेशन धान्याचा लाभ बंद करून केशरी किंवा पांढरे रेशनकार्ड देण्यात आले आहे.
रेशन धान्य दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंबातील लाभार्थ्यांना दरमहा मोफत धान्य मिळते. मात्र, यातील अनेक शिधापत्रिकाधारक हे शासकीय कर्मचारी आहेत. शासनाने पुरवठा विभागाला आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणीचे निर्देश दिले आहेत. पुरवठा विभागाकडून या लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे.
शासकीय कर्मचारी तथा योजनेत पात्र नसतानासुद्धा ३९ हजारांवर रेशनकार्डधारक सरकारी स्वस्त धान्याचा लाभ घेतल्याचे शासनाचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधितांची यादी जिल्हा पुरवठा विभागाला पाठविली. याची सध्या तालुकास्तरावर पडताळणी करून तथ्य आढळल्यास रेशनकार्डधारकांचा लाभआता बंद करण्यात येत आहे.
शासकीय घेतला रेशनचा लाभनोकरदारांनी
गेल्या सहा महिन्यांत धान्य घेतलेले नाही, मृत व्यक्ती, स्थलांतरित अशा १३ हजारांवर शिधापत्रिकांचे रेशन धान्य पुरवठा कार्यालयाने बंद केले आहे. यातील अनेक शिधापत्रिकाधारक हे शासकीय कर्मचारी आहेत. तसेच काही शिधापत्रिकाधारकांची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे पुरवठा विभागाद्वारा तालुकास्तरावर सुरू असलेल्या मोहिमेत निदर्शनात आले आहे.
जिल्हास्थिती शासनाकडून प्राप्त यादीतील
रेशनकार्डधारक - ३९,९५९
आतापर्यंत पडताळणी - १५,६१२
करण्यात आलेले पडताळणीनुसार यादीतील - २१५६
पात्र लाभार्थी तपासणीपश्चात अपात्र केलेले लाभार्थी - १३,४५६
यादीतील पडताळणी बाकी लाभार्थी - २५,५१८
सायलेंट, फ्लॅग आरसी तपासणीला गती
आता बोटाचे ठसे घेऊन धान्य वितरित केले जात असल्याने कोणत्या ग्राहकाने किती काळ धान्य घेतले नाही, हे लक्षात येते. ग्राहकांचे आधारकार्ड जोडल्याने त्यांची सर्व माहिती शासनाकडे उपलब्ध झाली आहे. याद्वारे प्रत्येक जिल्ह्यातील धान्य न घेणाऱ्या किंवा शासकीय सेवेत असणाऱ्या रेशनकार्डधारकांची यादी जिल्हा पुरवठा विभागाला पाठविली.
"शासनाद्वारा प्राप्त यादीतील रेशनकार्डधारकांची तपासणी व पडताळणी सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत १५,६१२ लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आलेली आहे."
- निनदा लांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी