प्रशासन आपल्या दारी संकल्पनेंतर्गत १५४१ जात प्रमाणपत्राचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:07+5:302021-07-10T04:10:07+5:30

मेळघाटातील जनतेला विविध कार्यालयांतर्गत योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. कोरोना काळात अनेक प्रतिबंध लागले असल्यामुळे जनतेला तहसील ...

Administration Distribution of 1541 caste certificates under your door concept | प्रशासन आपल्या दारी संकल्पनेंतर्गत १५४१ जात प्रमाणपत्राचे वितरण

प्रशासन आपल्या दारी संकल्पनेंतर्गत १५४१ जात प्रमाणपत्राचे वितरण

Next

मेळघाटातील जनतेला विविध कार्यालयांतर्गत योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. कोरोना काळात अनेक प्रतिबंध लागले असल्यामुळे जनतेला तहसील मुख्यालय गाठणे कठीण झाले होते. त्यामुळे त्यांना विविध योजनेत लाभ घेण्यात अडचण निर्माण होत होते. या परिस्थितीची जाणीव होताच उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार अतुल पाटोळे यांनी प्रशासन आपल्या दारी मोहीम राबविली. यात अतिदुर्गम जंगलातील रंगुवेली, चौराकुंड, फॉरेस्ट मालुर व नांदुरी या गावात जात प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याच अनुषंगाने ८ जुलै रोजी बाबंदा येथे कोरोना जनजागृती आणि लसीकरण शिबिर घेण्यात आले. दरम्यान मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते उपस्थितांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांनी आतापर्यंत १५४१ जात प्रमाणपत्राचे वाटप केल्याचे सांगण्यात आले. या शिबिरामुळे गरीब जनतेचे धारणी मुख्यालयी येण्या-जाण्याचा खर्चसुद्धा वाचले, हे विशेष.

Web Title: Administration Distribution of 1541 caste certificates under your door concept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.