रेल्वेच्या एलएचबी कोचला स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटची जोड
By गणेश वासनिक | Updated: December 4, 2023 17:41 IST2023-12-04T17:40:45+5:302023-12-04T17:41:34+5:30
शक्ती यान (पॉवर कार) रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते आणि ते डब्ब्यांमधील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, मोबाइल चार्जिंग पॉइंट यांसारख्या विविध घटकांना वीज पुरवते.

रेल्वेच्या एलएचबी कोचला स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटची जोड
अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने एलएचबी (लाल डब्यांची गाडी) शक्ती यानची चाचणी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण उपाययोजना तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाडीबंदरच्या कोचिंग डेपोमध्ये ‘स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिट्सची’ ओळख ही कार्यक्षमता वाढविणे आणि चलनातील अडचणी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत. मध्य रेल्वेच्या इतर कोणत्याही कोचिंग डेपोमध्ये स्थापित केलेली ही पहिलीच सुविधा आहे.
शक्ती यान (पॉवर कार) रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते आणि ते डब्ब्यांमधील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, मोबाइल चार्जिंग पॉइंट यांसारख्या विविध घटकांना वीज पुरवते. देखभाल दुरुस्तीनंतर, शक्ती यानची क्षमता व व्होल्टेज तपासणी केली जाते, ज्याला सामान्यतः लोड चाचणी, असे म्हणतात. पूर्वी अशा चाचणी प्रक्रियेच्या वेळ अधिक लागत होता. याप्रक्रियेत रेल्वेचे डबे वर्गीकरण प्रक्रिया करावी लागत होती. ‘स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिट्सचा’ वापर सुरू झाल्यापासून या प्रक्रियेत चांगला बदल झाला आहे. या युनिट्स लोड चाचणीनंतर रेल्वे डब्यांना पारंपरिक पद्धतीच्या अगदी विपरितपणे अतिरिक्त शक्ती यान तत्काळ सेवेसाठी जोडता येत आहेत.
या नव्या उपक्रमामुळे एलएचबी कोचमध्ये शेवटचा डबा पॉवर कार म्हणून अन्य २२ कोचला वीजपुरवठा सुरळीत करतो. मुंबईत हा उपक्रम सुरू झाला असूृन, येत्या काळात पुणे, सोलापूर, नागपूर व भुसावळ विभागातही सुरू हाेणार आहे. आता मनुष्यबळ, विजेचा वापर नियंत्रित होत आहे. एकूण २,३०० एलएचबी डब्यात ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
- शिवाजी मानसपुरे, जनसंपर्क अधिकारी, मुंबई मध्य रेल्वे