रवी राणांचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटात हाणामारी, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल

By गणेश वासनिक | Published: September 12, 2023 04:19 PM2023-09-12T16:19:47+5:302023-09-12T16:20:42+5:30

पोलिस स्टेशन समोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी

Activists of Ravi Rana and Thackeray group clash, cases filed against each other | रवी राणांचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटात हाणामारी, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल

रवी राणांचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटात हाणामारी, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल

googlenewsNext

अंजनगाव सुर्जी/ वनोजा बाग : आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टी तर्फे सोमवार, ११ सप्टेंबर रोजी अंजनगाव सुर्जी येथे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. दरम्यान कार्यक्रम आटोपून आमदार रवी राणा व कार्यकर्ते अमरावतीकडे जाण्यासाठी निघाले असता नवीन बसस्थानक परिसरातील अग्रसेन चौकात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख महेंद्र दिप्टे यांच्याशी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील चौघांविरूद्ध मारहाण, जिवे मारण्याची धमकी व अश्लील शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख महेंद्र दिप्टे यांच्या तक्रारीवरून मंगेश कोकोटे, विठ्ठल ढोले व अजय देशमुख यांच्या विरूध्द तर आ. रवी राणा यांचे कार्यकर्ते मंगेश कोकाटे यांच्या तक्रारीवरून महेंद्र दिप्टे यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविला आहे. दहीहंडी कार्यक्रम दरम्यान आ. राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यावरून हा वाद झाल्याची माहिती आहे. ही घटना नवीन बस स्थानक परिसरात अचानक घडल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांनी महेंद्र दिप्टे यांना ताब्यात घेतले. पोलिस स्टेशन समोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून आरोप- प्रत्यारोप केले जात आहे.

Web Title: Activists of Ravi Rana and Thackeray group clash, cases filed against each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.