शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारीमुक्तीसाठी आता 'अ‍ॅक्शन प्लॅन'

By admin | Updated: March 1, 2015 00:24 IST

जिल्ह्यात हागणदारीमुक्तीची चळवळ मोठ्या जोमाने विस्तारत आहे. आजमितीस जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के कुटुंबाकडे शौचालय तयार झाले असून येत्या तीन वर्षांत २ लाख शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अमरावती : जिल्ह्यात हागणदारीमुक्तीची चळवळ मोठ्या जोमाने विस्तारत आहे. आजमितीस जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के कुटुंबाकडे शौचालय तयार झाले असून येत्या तीन वर्षांत २ लाख शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार करून तो राज्य व केंद्र शासनाकडे सादर केला जाणार आहे. या माध्यमातून टप्प्याटप्प्याने संपूर्ण अमरावती जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर आभाळे यांनी शौचालय बांधकामाचा उपक्रम सुरू केला आहे. सध्या ग्रामीण भागात शौचालयाबाबत जनजागृती करण्यावर अधिक भर आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या तब्बल ७० टक्के लोकांकडे शौचालयाचे काम पूर्णत्वास येत आहे. उर्वरित साधारणत: अडीच लाख लोकांकडे आजही वैयक्तिक शौचालय नाही. परंतु या लोकांकडे जनजागृती करण्याच्या अनुषंगाने सीईओंनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधकामाचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी लाभार्थ्यांना तब्बल १२ हजार रूपये प्रोत्साहन म्हणून दोन लाख शौचालयाची उद्दिष्टपूर्ती बऱ्याचपैकी झाली आहे. उर्वरित शौचालयांच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कक्षाच्यावतीने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. या अ‍ॅक्शन प्लॅननुसार पुढील तीन वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत केला जाणार आहे. (प्रतिनिधी)