येवदा येथे ३४ जणांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:12 IST2021-04-24T04:12:37+5:302021-04-24T04:12:37+5:30

येवदा : मास्क न घालणाऱ्यांसह फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या ३४ व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात ...

Action against 34 persons at Yevda | येवदा येथे ३४ जणांविरुद्ध कारवाई

येवदा येथे ३४ जणांविरुद्ध कारवाई

येवदा : मास्क न घालणाऱ्यांसह फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या ३४ व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.

ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण प्रतिबंधात्मक पथकप्रमुख मुख्याध्यापक दिलीप वैद्य, कृषी अधीक्षक वासुदेव भोई, तलाठी शिल्पा रायबोले, कल्पना कासरकर, गौरव सुरपाटणे, शाखा अभियंता शंकर नावकर, शिक्षक जयसिंह पवार, संदीप बेराळ, असदउल्ला अहमद , हबीबखाँ यांनी ही कारवाई केली.

ठाणेदार अमूल बच्छाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांनी चार व्यक्तींवर भादंविचे कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला. ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा माकोडे व उपसरपंच मुजम्मिल जमादार व सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी राम वाघमारे तसेच महसूल विभाग व शिक्षक पथक तसेच गावातील नागरिक ओम प्रकाश शर्मा, राजू मानकर यांनी संयुक्त ३४ लोकांवर कारवाई करण्यात आली.

Web Title: Action against 34 persons at Yevda