अचलपूर शिवसेनाप्रमुखावर प्राणघातक हल्ला; प्रकृती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:01 IST2021-08-09T05:00:00+5:302021-08-09T05:01:02+5:30
पवन बुंदेले हे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सहकाऱ्यांसमवेत ८ ऑगस्टला क्रिकेट खेळत होते. दुपारी ४ च्या सुमारास पाच दुचाकींवर आलेल्या आरोपींनी पाईप, सळाखी आणि चायना चाकूने पवन बुंदेले यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. हल्ल्यात पवन बुंदेले यांच्यासह योगेश मनोहर जडिये (३५, रा. चावल मंडी), चुलतभाऊ नितीन लक्ष्मण बुंदेले (४०, रा. बिलनपुरा) आणि वीरेंद्र सेंगर (२८, रा. जुना सराफा) हे जखमी झाले.

अचलपूर शिवसेनाप्रमुखावर प्राणघातक हल्ला; प्रकृती गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर शहर शिवसेनाप्रमुख तथा माजी नगरसेवक पवन बुंदेले (४६, रा. बिलनपुरा) यांच्यावर आठ ते दहा जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात त्यांचे अन्य तीन सहकारी जखमी झाले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना अमरावतीला रेफर करण्यात आले, तर अन्य तिघांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पवन बुंदेले हे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सहकाऱ्यांसमवेत ८ ऑगस्टला क्रिकेट खेळत होते. दुपारी ४ च्या सुमारास पाच दुचाकींवर आलेल्या आरोपींनी पाईप, सळाखी आणि चायना चाकूने पवन बुंदेले यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. हल्ल्यात पवन बुंदेले यांच्यासह योगेश मनोहर जडिये (३५, रा. चावल मंडी), चुलतभाऊ नितीन लक्ष्मण बुंदेले (४०, रा. बिलनपुरा) आणि वीरेंद्र सेंगर (२८, रा. जुना सराफा) हे जखमी झाले. या जखमींना सर्वप्रथम उपचारार्थ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. तेथून गंभीर जखमी असलेले पवन बुंदेले यांना अमरावतीला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, नितीन बुंदेले यांनी फिर्याद नोंदविली. हल्लेखोरांपैकी पवन पैदल परीवाले (रा. कांडली, परतवाडा) याला रविवारी सायंकाळी अचलपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह शुभम ऊर्फ बम नंदवंशी, सोमेश हिरालाल कडू, काळू चौधरी, घनश्याम नंदवंशी, धीरज नंदवंशी, सिद्धू साबनकर यांनी हल्ला केल्याचे त्याने सांगितले. त्यांच्या अटकेसाठी चार पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
हल्लाप्रकरणातील आरोपींची माहिती मिळाली आहे. फिर्याद नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल होताच आरोपींना अटक करण्यात येईल.
- मनोज चौधरी,
ठाणेदार, अचलपूर