अचलपूर पंचायत समिती अमरावती विभागातून प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:16 AM2021-01-16T04:16:34+5:302021-01-16T04:16:34+5:30

परतवाडा : यशवंत पंचायत राज अभियान २०२०-२०२१ अंतर्गत अमरावती विभागातून अचलपूर पंचायत समितीला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वीसुद्धा अचलपूर ...

Achalpur Panchayat Samiti from Amravati division first | अचलपूर पंचायत समिती अमरावती विभागातून प्रथम

अचलपूर पंचायत समिती अमरावती विभागातून प्रथम

googlenewsNext

परतवाडा : यशवंत पंचायत राज अभियान २०२०-२०२१ अंतर्गत अमरावती विभागातून अचलपूर पंचायत समितीला प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

यापूर्वीसुद्धा अचलपूर पंचायत समितीने यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत अमरावती विभागातून सतत चार वर्षे प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. यंदा परत एकदा अचलपूर पंचायत समिती अमरावती विभागात अव्वल ठरली आहे. गतवर्षी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत अचलपूर पंचायत समितीने राज्यस्तरावर द्वितीय पुरस्कार पटकावला होता.

पंचायत समिती व ग्रामपंचायत व्यवस्थापनासह विकासात्मक कार्यात अचलपूर पंचायत समितीची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. यात महिला व बाल कल्याण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, घरकुल, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, समाजकल्याण, बांधकाम, उमेद, निवृत्तीवेतनसह सर्वच विभागात राबविल्या गेलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे त्रयस्थ यंत्रणा (समिती मार्फत) कडून केल्या गेलेल्या मूल्यमापनात अचलपूर पंचायत समिती पुरस्कारास पात्र ठरली आहे.

अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांच्या नेतृत्वात सर्वच प्रशासकीय विभागप्रमुख, कर्मचारी, अधिकारी यांचे अथक प्रयत्न या पुरस्काराच्या अनुषंगाने उल्लेखनीय ठरले आहेत. पंचायत समिती सभापती कविता अमोल बोरेकार, उपसभापती श्रीधरराव काळे, माजी सभापती देवेंद्र पेटकर, सदस्य सुनील तायडे, विशाल काकड, आशिष जावरकर, सुनीता दांडगे, सोनाली तट्टे, आशा धामणकर यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण राहिले आहे.

Web Title: Achalpur Panchayat Samiti from Amravati division first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.