हरभरा चोरीप्रकरणी आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:27 IST2018-04-16T22:27:17+5:302018-04-16T22:27:17+5:30
गतवर्षी १० आॅक्टोबरला येथील हरभरा विक्री प्रकरणात येथील धान्य व्यापारी मनोहर दामोरदास राठी यांची दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी २६ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले.

हरभरा चोरीप्रकरणी आरोपींना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : गतवर्षी १० आॅक्टोबरला येथील हरभरा विक्री प्रकरणात येथील धान्य व्यापारी मनोहर दामोरदास राठी यांची दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी २६ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले.
आरोपींनी दिल्ली येथे शिवशक्ती इंडिया फ्यूट या नावाने खोटी माहीती देऊन राठी यांच्याजवळून ४६० क्विंटल हरभरा खरेदी केला. मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केली. यामध्ये २६ लाख १५ हजार ७५० रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार राठी यांनी दर्यापूर ठाण्यात केली होती. सदर प्रकरणातील दर्यापूर पोलीस ठाण्याचे पथक तैनात करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक मंगेश मोहोड, शिद्धार्थ आठवले, अरविंद चौहान, जयकुमार वाहाने यांच्या पथकाने ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आरोपींचा शोध घेवून सोमनाथ बनारसीदास शर्मा (४०, रा. टिटयाना, जिल्हा कैथल), अजितशहा ऊर्फ रहेमान नागेश्वर प्रसाद (३८, रा.बीरपूर, जिल्हा बेगुसराय बिहार) या दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणातील मनोज अत्री हा पसार आहे. पुढील तपास ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मंगेश मोहोड शिद्धार्थ आठवले करीत आहे.