मांडवा झोपडपट्टीतून तडीपार आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:11+5:302021-03-07T04:13:11+5:30

अमरावती : तडीपारीच्या आदेशाचे उल्लघंन करून शहरात आढळून आल्याने सूरज छाडू निखरे (५०, रा. महालक्ष्मीनगर) याला मांडवा झोपडपट्टीतून अटक ...

Accused arrested from Mandwa slum | मांडवा झोपडपट्टीतून तडीपार आरोपी ताब्यात

मांडवा झोपडपट्टीतून तडीपार आरोपी ताब्यात

Next

अमरावती : तडीपारीच्या आदेशाचे उल्लघंन करून शहरात आढळून आल्याने सूरज छाडू निखरे (५०, रा. महालक्ष्मीनगर) याला मांडवा झोपडपट्टीतून अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी गाडगेनगर पोलिसांनी केली.

-------------------------------------------------

दाभा येथे जुगार पकडला

बडनेरा : नजीकच्या दाभा येथील बस स्थानकाजवळ पोलिसांनी जुगार साहित्यासह १५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रूपराव पुंडलिकराव वरखडे (६७) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.

-----------------------------------------------लक्ष्मीनगरात जुगार पकडला

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी लक्ष्मीनगरनजीक मांडवा झोपडपट्टी येथे कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह दोन दुचाकी व मोबाईल असा एकूण ६४,७१० रुपयांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला. कैलाश लालुप्रसाद यादव (५२, रा. लक्ष्मीनगर), अनिल मोहन खंडारे (३८, रा. रमाबाई आंबेडकरनगर), सुनील विलास आठवले (२७, रा. सिद्धार्थनगर), अक्षय ज्ञानेश्वर गाढवे (२४, रा. गाडगेनगर) यांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक पूजा खांडेकर पुढील तपास करीत आहेत.

-----------------------------------------------------

शिवाजीनगर येथे दारू जप्त

अमरावती : राजापेठ पोलिसांनी येथील शिवाजीनगरात १२०० रुपये किमतीची अवैध दारू शुक्रवारी जप्त केली. शैलेश उर्फ पिंटू विजय चव्हाण(४२) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Accused arrested from Mandwa slum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.