बालभारती मंडळातील भांडार अधिक्षकांचा आकस्मिक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 19:54 IST2019-08-28T19:54:02+5:302019-08-28T19:54:07+5:30
बालभारती पाठ्यपुस्तक मंडळातील भांडार अधिक्षक (पुस्तक) पदावर कार्यरत असलेले हरिभाऊ हनुमंत चव्हाण (४६,रा. दौंड, जि.पुणे) यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले.

बालभारती मंडळातील भांडार अधिक्षकांचा आकस्मिक मृत्यू
अमरावती: बालभारती पाठ्यपुस्तक मंडळातील भांडार अधिक्षक (पुस्तक) पदावर कार्यरत असलेले हरिभाऊ हनुमंत चव्हाण (४६,रा. दौंड, जि.पुणे) यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणला होता.
हरिभाऊ चव्हाण यांचे कुटुंबीय दौंड येथे राहत होते तसेच नोकरीमुळे ते पाठ्यपुस्तक मडंळातील गेस्ट हाऊस येथील क्वार्टरमध्ये राहत होते. बुधवारी सकाळी कर्तव्यावर जाण्यासाठी ते तयारी करीत होते. चहा पिऊन ते बेडवर पेपर वाचत असताना खाली कोसळले. त्यानंतर थोड्याच वेळात पाठ्यपुस्तक मंडळातील कर्मचारी चव्हाण यांना बोलाविण्यास गेले असता, त्यांना चव्हाण हे खाली पडलेल्या अवस्थेत दिसले.
त्यानंतर तत्काळ चव्हाण यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहास शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले होते. पुढील चौकशी गाडगेनगर पोलीस करीत आहे.