Accident: नागपूर-औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवेवर ट्रकला भीषण अपघात, ट्रक जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:16 PM2021-10-24T12:16:10+5:302021-10-24T12:16:22+5:30

Accident News: औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवे वरील तळेगाव दशासर नजीक ट्रकचा अपघात झाल्याने सदर ट्रक ने पेट घेतल्या मुळे पूर्णतः जळून खाक झाला. 

Accident: Truck accident on Nagpur-Aurangabad Super Express Highway, truck burnt to ashes | Accident: नागपूर-औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवेवर ट्रकला भीषण अपघात, ट्रक जळून खाक 

Accident: नागपूर-औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवेवर ट्रकला भीषण अपघात, ट्रक जळून खाक 

Next

- निलेश रामगावकर

 अमरावती - नागपूर  - औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवे वरील तळेगाव दशासर नजीक ट्रकचा अपघात झाल्याने सदर ट्रक ने पेट घेतल्या मुळे पूर्णतः जळून खाक झाला. पोलीस सुत्रा नुसार आज सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली  सदर ट्रक लोखंड बनविण्याकरिता वापरल्या जाणारा कच्चा माल देवगावहून तळेगावकडे येत असताना रोडच्या मधोमध अपघात झाल्याने सदर ट्रकने पेट घेतला.
मात्र, जीवितहानी टळली. ट्रकचालक उडी मारून पसार झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून चांदुर रेल्वे येथील अग्निशमन दलाला पाचारण करुन आगीवर नियंत्रण मिळण्यात आले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी उसळलेली होती.

Web Title: Accident: Truck accident on Nagpur-Aurangabad Super Express Highway, truck burnt to ashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Accidentअपघात