दर्यापूर-अंजनगाव मार्गावरील लेगाव फाट्याजवळ भीषण अपघात; ५ ठार, ७ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 10:40 IST2023-05-23T10:08:13+5:302023-05-23T10:40:09+5:30

अंजनगाव दर्यापूर मार्गांवरील इटकी फाट्यावर ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत टेम्पोतील पाच प्रवासी ठार झाले.

accident near Legaon fork on Daryapur Anjangaon road; 5 killed, 7 injured | दर्यापूर-अंजनगाव मार्गावरील लेगाव फाट्याजवळ भीषण अपघात; ५ ठार, ७ जखमी

दर्यापूर-अंजनगाव मार्गावरील लेगाव फाट्याजवळ भीषण अपघात; ५ ठार, ७ जखमी

अमरावती - दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी मार्गावर लेहगाव फाट्यानजीक सोमवारी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास लग्नावरून परत येताना दोन वाहनात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार तर सात जण जखमी झाले आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे भरती करण्यात आले. अंजनगाव दर्यापूर मार्गांवरील इटकी फाट्यावर ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत टेम्पोतील पाच प्रवासी ठार झाले.

पत्नी व 9 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे अमरावतीच्या ज़िल्हा सामान्य रुग्णालयात दगावले. खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इटकी फाट्याजवळ सोमवारी रात्री 10 ते 11 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. शेख अझहर शेख अन्वर 35, नासिया परवीन शेख अझहर  30, व अन्सारा परवीन शेख अझहर (9)यांचा मृतात समावेश आहे. दर्यापूर च्या टाटानगर येथील शेख एजाज शेख अब्बास हे कुटुंबासाह अंजनगाव येथून मुलीच्या दिराच्या लग्नाच्या निमित्ताने झालेला वलिमा आटोपून एका पिकअप टेम्पोने सोमवारी रात्री 10 च्या सुमारास एकूण 13 जण अंजनगावहून दर्यापूरकडे निघाले.

इटकी फाट्याजवळ टेम्पोला ट्रकने धडक दिली. यात अन्य आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहतूक शाखा निरीक्षक गोपाल उंबरकर व खल्लारचे ठाणेदार किरण औटे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान अमरावतीच्या इर्वीन हॉस्पिटलमध्ये दोघे दगवल्याने मृतांची संख्या पाच झाली. गंभीर जखमी असलेल्यावर इर्वीन सह पीडीएमसि रुग्णालयात हलविण्यात आले.
 

Web Title: accident near Legaon fork on Daryapur Anjangaon road; 5 killed, 7 injured