पांढरी स्मशानभूमीजवळ पुन्हा अपघात, दोघे दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 05:00 IST2021-09-09T05:00:00+5:302021-09-09T05:00:58+5:30
अचलपूर येथे नियोजित अंगणवाडीसंबंधी एका कार्यक्रमासाठी निपाणे हे एमएच २७ बीव्ही २०१२ क्रमांकाच्या कारने अंगणवाडी सेविका ललिता चव्हाण यांच्यासमवेत प्रबोधनपर मार्गदर्शनासाठी जात होते. पांढरीनजीक त्यांच्या कारवर भरधाव ट्रक (आरजे १६/आर २००२) आदळला. चव्हाण यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेले निपाने यांना अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयातून अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अत्याधिक रक्तस्रावाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पांढरी स्मशानभूमीजवळ पुन्हा अपघात, दोघे दगावले
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी/पथ्रोट : अंजनगाव ते परतवाडा राष्ट्रीय महामार्गावर पांढरी खानमपूर स्मशानभूमीनजीक वळण मार्गावर मालवाहू ट्रक आणि कार यांच्यात भीषण धडक होऊन कारमधील महिला ललिता पंडित चव्हाण (४५, रा. सुर्जी, अंजनगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालवित असलेले अंजनगाव सुर्जी येथील निपाणे मेडिकल स्टोअरचे संचालक प्रमोद निपाणे (५५) हे अमरावती येथील खासगी रुग्णालयात दगावले.
प्राप्त माहितीनुसार, अचलपूर येथे नियोजित अंगणवाडीसंबंधी एका कार्यक्रमासाठी निपाणे हे एमएच २७ बीव्ही २०१२ क्रमांकाच्या कारने अंगणवाडी सेविका ललिता चव्हाण यांच्यासमवेत प्रबोधनपर मार्गदर्शनासाठी जात होते. पांढरीनजीक त्यांच्या कारवर भरधाव ट्रक (आरजे १६/आर २००२) आदळला. चव्हाण यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेले निपाने यांना अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयातून अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अत्याधिक रक्तस्रावाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
योगा कार्यक्रमानिमित्त अचलपूरला
प्रमोद निपाणे व ललिता चव्हाण हे अनुक्रमे ज्येष्ठ वक्ता व योगशिक्षक होते. ते या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अचलपूरला जात होते. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. पथ्रोट व अंजनगाव पोलीस दाखल झाले होते. अंजनगाव पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला.
दहा दिवसांपूर्वी अपघातात दोघे ठार
दहा दिवसांपूर्वी महामार्गावरील याच ठिकाणी मध्य प्रदेशातून देव दर्शनाहून परतणाऱ्या युवकांचे वाहन कठड्याला धडकून अपघात घडला होता. यात सुर्जी भागातील दोन युवक दगावले. या ठिकाणी सदोदित अपघातच घडत असतात.