अमरावतीच्या पोलीस आयुक्तपदी आरती सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 21:31 IST2020-09-02T21:31:10+5:302020-09-02T21:31:42+5:30
नाशिक येथे पोलीस अधीक्षकपदाहून बदलून आलेल्या आरती सिंह यांची अमरावती शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अमरावतीच्या पोलीस आयुक्तपदी आरती सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नाशिक येथे पोलीस अधीक्षकपदाहून बदलून आलेल्या आरती सिंह यांची अमरावती शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासूनच्या प्रथम महिला पोलीस आयुक्त ठरल्या आहेत.
अमरावतीचे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांची बदली करण्यात आली असून त्यांना अद्याप पदस्थापना जाहीर करण्यात आलेली नाही. अमरावती शहराच्या पालकमंत्री आणि खासदार यादेखील महिलाच आहेत. पोलीस आयुक्त या महत्त्वपूर्ण पदावरही महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यामुळे आता महिलांच्या सबलीकरणला आगळी मजबुती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.