अमरावतीत २५ वर्षीय तरुणाची काठीने वार करून हत्या; मारेकरी अटकेत

By प्रदीप भाकरे | Updated: September 1, 2022 13:27 IST2022-09-01T13:27:25+5:302022-09-01T13:27:59+5:30

गुन्हेगारी प्रवृत्तीचा व अनेक गुन्हे दाखल असलेला शुभम गुल्हाने हा तेथील चौकीदार रायबोले याला चाकूने संपविण्याची धमकी देत होता.

A youth was stabbed to death with a stick over a trivial reason in Amravati; Murder watchman arrested | अमरावतीत २५ वर्षीय तरुणाची काठीने वार करून हत्या; मारेकरी अटकेत

अमरावतीत २५ वर्षीय तरुणाची काठीने वार करून हत्या; मारेकरी अटकेत

अमरावती : क्षुल्लक कारणावरून जवाहर गेट भागातील महापालिका संकुलात एका २५ वर्षीय तरुणाची काठीने वार करून हत्या करण्यात आली. गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघड झाली. शुभम उर्फ बाबा गुल्हाने (२५, रा. साबणपुरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी तेथील चौकीदार विनायक रामचंद्र रायबोले (६०, अमरावती) याला ताब्यात घेतले आहे.

जवाहरगेट स्थित महापालिकेच्या संकुलात एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याची माहिती शहर कोतवाली पोलिसांना देण्यात आली. त्या माहितीवरून गुरुवारी सकाळच्या सुमारास त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तो उपचारास दाद देऊ शकला नाही.

गुन्हेगारी प्रवृत्तीचा व अनेक गुन्हे दाखल असलेला शुभम गुल्हाने हा तेथील चौकीदार रायबोले याला चाकूने संपविण्याची धमकी देत होता. बुधवारी उशिरा रात्री त्यातूनच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यातून रायबोले याने शुभमला काठीने बेदम मारहाण केली. कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड, शहर कोतवालीच्या ठाणेदार निलिमा आरज यांनी भेट दिली.

Web Title: A youth was stabbed to death with a stick over a trivial reason in Amravati; Murder watchman arrested