बसडेपोतून दुचाकी लांबविणारा चोर कोतवालीच्या जाळ्यात
By प्रदीप भाकरे | Updated: October 8, 2023 19:33 IST2023-10-08T19:32:44+5:302023-10-08T19:33:11+5:30
पोस्टल कॉलनी येथील पंडित तायडे हे वर्धा गाडीची विचारपूस करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकातील चौकशी कक्षात गेले.

बसडेपोतून दुचाकी लांबविणारा चोर कोतवालीच्या जाळ्यात
अमरावती : येथील मध्यवर्ती बसस्थानकातून दुचाकी लांबविणाऱ्या चोराला शहर कोतवाली पोलिसांनी ७ ऑक्टोबर रोजी जेरबंद केले. त्याने चोरीची कबुली दिली असून, त्याच्याकडून ती दुचाकी जप्त करण्यात आली. गौरव विठ्ठलराव ढोणे (२७, रा. म्हैसपूर, ता. भातकुली) असे अटक चोराचे नाव आहे.
पोस्टल कॉलनी येथील पंडित तायडे हे वर्धा गाडीची विचारपूस करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकातील चौकशी कक्षात गेले. परत आले असता त्यांची मोपेड आढळून आली नाही. याप्रकरणी, २७ मार्च रोजी अज्ञात आरोपीविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्याचा तपास करित असताना माहितीच्या आधारे गौरव ढोणे याला ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात आला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे, कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरिक्षक राजेश सपकाळ, दिपक श्रीवास, मंगेश दिघेकर, मोहमद समीर, सागर ठाकरे यांनी ही कारवाई केली.