समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग; प्रसंगावधानतेमुळे चालकांसह ३२ प्रवाशी बचावले

By संदीप वानखेडे | Updated: October 1, 2023 12:07 IST2023-10-01T09:45:07+5:302023-10-01T12:07:10+5:30

चॅनल नंबर २८० वरील घटना : पुणे येथे जात हाेती खासगी बस मेहकर :

A private bus caught fire on the Samriddhi highway, 32 passengers including the driver were rescued | समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग; प्रसंगावधानतेमुळे चालकांसह ३२ प्रवाशी बचावले

समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग; प्रसंगावधानतेमुळे चालकांसह ३२ प्रवाशी बचावले

बुलढाणा - अमरावती येथून पुणे येथे जात असलेल्या खासगी बसला एसीची वायर शाॅर्ट झाल्याने आग लागली. ही घटना समृद्धी महामार्गावर चॅनल २८० जवळ ३० सप्टेंबर राेजी रात्री १२ वाजता घडली. सुदैवाने यातील दाेन चालकांसह ३२ प्रवाशी सुखरुप आहेत.

अमरावती येथून खासगी बस क्रमांक एमएच ३७ टी ५४५४ ही पुणे येथे जाण्यासाठी शनिवारी रात्री निघाली हाेती. समृद्धी महामार्गावर चॅनल नं़ २८० जवळ ही बस पाेहचल्यानंतर बसने पेट घेतली. ही बाब चालकाच्या निदर्शनास येताच त्याने बस रस्त्याच्या बाजुला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. या घटनेची माहिती मिळताच फर्दापूर चाैकीचे पीएसआय उज्जैनकर, हेकाॅ काेळी, पाेकाॅ नाझीर यांनी घटनास्थळावर धाव घेतली.तसेच क्यूआरव्ही पथकाच्या मदतीने आग विझवण्यात आली. या बसचे चालक शेख रज्जाक शेख आयुब रा. दारव्हा आणि प्रविण मुंडे रा. मंगरुळपीर यांच्यासह ३२ प्रवाशी सुखरुप आहेत. पाेलिसांनी या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून रवाना केले. खासगी बसमधील एसीचा केबल शाॅर्ट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: A private bus caught fire on the Samriddhi highway, 32 passengers including the driver were rescued