जेलमधून सुटताच घरफोड्यांचे सत्र, अट्टल चोरटा पोलिसांनी पुन्हा पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 04:18 PM2023-11-25T16:18:23+5:302023-11-25T16:18:48+5:30

तिघांना अटक; पाच गुन्हांची उकल, राजापेठची कारवाई

A five-house burglary session soon after his release from jail, notorious criminal recaptured by the police | जेलमधून सुटताच घरफोड्यांचे सत्र, अट्टल चोरटा पोलिसांनी पुन्हा पकडला

जेलमधून सुटताच घरफोड्यांचे सत्र, अट्टल चोरटा पोलिसांनी पुन्हा पकडला

अमरावती : महिना, दीड महिन्यापूर्वी नागपूर कारागृहातून सुटताच चोरी, घरफोडी करत सुटलेल्या अट्टल चोराला राजापेठ पोलिसांनी जेरबंद केले. पंकज राजू गोंडाणे (२७, रा. चवरेनगर, अमरावती) असे त्या सराईत चोराचे नाव आहे. त्याच्यासोबतच दोन सराईत चोरांना अटक करण्यात आली आहे. तीनही आरोपींनी शहरातील पाच गुन्ह्यांची कबुली दिली असून, सुमारे ३.८३ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात राजापेठ पोलिसांना यश आले आहे.

त्या तिघांच्या अटकेमुळे शहरातील आणखी १० ते १५ चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी व्यक्त केली. २४ नोव्हेंबर रोजी एका पत्रपरिषदेत रेड्डी यांनी राजापेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली. राजापेठ पोलिसांनी जयदत्त कॉलनी येथील अशोक शिंदे यांच्या घरात दडलेल्या दोन चोरांना रंगेहाथ पकडले होते. त्यांनी शिंदे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी शंकर बनसोड (४२, रा. भीमनगर) व परमेश्वर सुखदेव (१९, रा. केडियानगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ते दोघेही वरच्या माळ्यावर दडून बसले होते. २२ नोव्हेंबर रोजी पहाटे ३:१५च्या सुमारास हा प्रकार घडला होता. त्या दोघांनी पीसीआरदरम्यान पंकज गोंडाणे हा चोरीच्या घटनांचा सूत्रधार असल्याचे सांगितले. त्यावरून रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या पंकज गोंडाणे याला अटक करण्यात आली. त्याच्यावर अमरावती शहरासह विदर्भातील अनेक शहरात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तो अमरावती पोलिसांना गुंगारा देत होता. ठाणेदार सीमा दाताळकर यांच्या नेतृत्त्वातील टीम राजापेठने ही यशस्वी कारवाई केली.

३.८२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

तिघांच्या अटकेमुळे राजापेठमधील तीन व बडनेरा व नांदगाव पेठमधील प्रत्येकी एक अशा पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे. दरम्यान, आरोपी सुखदेवे याच्याकडून ३३ ग्रॅम ९०० ग्रॅम सोने, सव्वा किलो चांदी, मोपेड व १५६० रुपये रोख असा ३ लाख ८३ हजार ५१० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. गोंडाणे याच्याकडून मोठा मुद्देमाल जप्तीची शक्यता आहे. तो आणखी दोन दिवस पोलिस कोठडीत आहे.

...टीम राजापेठ

सीपी नवीनचंद्र रेड्डी, डीसीपी सागर पाटील व एसीपीद्वय शिवाजी बचाटे व कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठच्या ठाणेदार सीमा दाताळकर, उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, अंमलदार गंगाधर जाधव, छोटेलाल यादव, सागर सरदार, नीलेश गुल्हाने, दिनेश भिसे, प्रशांत गिरडे, नरेश मोहरिल, शेख वकील, मनीष करपे, गणराज राऊत, पंकज खटे, पांडुरंग बुधवंत यांनी कारवाई केली.

Web Title: A five-house burglary session soon after his release from jail, notorious criminal recaptured by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.