स्थानिक गुन्हे शाखेने पकडली ९.३८ लाखांची रोकड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 20:58 IST2024-11-08T20:58:43+5:302024-11-08T20:58:57+5:30
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियमित गस्तीवर असतांना त्यांनी धामणगाव रेल्वे येथे एका इसमाची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे ५ लाख रुपये मिळून आले.

स्थानिक गुन्हे शाखेने पकडली ९.३८ लाखांची रोकड
- प्रदीप भाकरे
अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धामणगाव रेल्वे व चांदुररेल्वे येथून एकुण ९ लाख ३८ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. ८ नोव्हेंबर रोजी या दोन्ही कारवाया करण्यात आल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियमित गस्तीवर असतांना त्यांनी धामणगाव रेल्वे येथे एका इसमाची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे ५ लाख रुपये मिळून आले. त्याने समाधान कारक उत्तर न दिल्याने ती रक्कम जप्त करण्यात आली. संबंधित व्यक्ती हा धामणगाव रेल्वे येथील रहिवासी आहे. तर दुसऱ्या कारवाईत चांदूर रेल्वे येथे एका इसमाकडे ४.३८ लाख रुपये दिसून आले. त्याने देखील रोख रकमेबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने ती रक्कम जप्त करण्यात आली आहे. तो व्यक्ती अमरावतीच्या मसानगंज येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या दोन्ही व्यक्तींकडे रोख रक्कमेसंबंधात असणारे पुरावे तपासून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरिक्षक मो. तसलिम यांच्या पथकाने ही कारवाई केली. यापुर्वी केलेल्या चार कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने २७.१६ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली.