900 remedies available in the district in three days | जिल्ह्यात तीन दिवसांनी ९०० रेमडिसिव्हिर उपलब्ध

जिल्ह्यात तीन दिवसांनी ९०० रेमडिसिव्हिर उपलब्ध

ठळक मुद्देजिल्ह्यात दरदिवशी दोन ते अडीच हजार इंजेक्शनची गरज, पुन्हा तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चार दिवसांपासून तुटवडा असलेले रेमडिसिव्हिर इंजेक्शनचे ९०० व्हायल गुरुवारी जिल्ह्यास उपलब्ध झाले व ते सर्व कोविड रुग्णालयांना उपलब्ध करण्यात आलेले आहे. जिल्ह्याची मागणी दोन ते अडीच हजार रेमडिसिव्हिरची असल्याने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झालेली आहे.
कोरोना रुग्णांवर गुणकारी असलेले रेमडिसिव्हिरची सध्या मोठी मागणी असताना, त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. चार दिवसांपूर्वी ३०० रेमडिसिव्हिर उपलब्ध झाले व एका  दिवसांत संपले होते. जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून उसनवार पद्धतीने पीडीएमएमएसीसह शहरातील कोविड रुग्णालयांना ४०० रेमडिसिव्हिर उपलब्ध केले होते व डॉक्टरांच्या विहित फाॅर्मवर ते उपलब्ध करण्यात येत होते. यासाठी मोठी रांग सकाळपासून असल्याचे दिसून आले.

अन्य जिल्ह्यातील रुग्ण दाखल झाल्याने वाढली मागणी
सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने तेथील आरोग्य यंत्रणेवर ताण आला व रुग्ण अमरावती जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाले. त्यामुळे रेमडिसिव्हिरची मागणी वाढली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यासाठी अधिक मागणी नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

डेपोकडे ३० लाख ॲडव्हांस जमा
रेमडिसिव्हिरसाठी विविध कंपनीच्या नागपूर येथील डेपोत जिल्ह्यातील स्टॉकिस्टने ३० लाखांवर आगाऊ रक्कम जमा केलेली आहे. यासाठी बहुतेक  मेडीकल दुकानदारांनी एक ते दीड लाखांपर्यंतची रक्कम दिल्याची माहिती एफडीएद्वारा देण्यात आली. मात्र, मागणी इतका पुरवठा अद्यापही झालेला नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे.

 

Web Title: 900 remedies available in the district in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.