शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
3
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
4
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
5
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
6
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
7
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
8
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
9
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
10
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
11
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
12
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
13
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
14
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
15
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
16
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
17
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
18
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
19
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात १० महिन्यांत ८८८ शेतकऱ्यांनी जीवन संपवले; दिवाळीत ८७ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:01 IST

Amravati : पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद केल्या जाते. तेव्हापासून ऑक्टोबर २०२५ या कालावधीत २२,०३८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भातशेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबलेले नाही. यावेळी दिवाळीच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये तब्बल ८७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे, तर यंदाच्या १० महिन्यांत ८८८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. १ जानेवारी २००१ पासून आतापर्यंत २२,०३८ शेतकरी आत्महत्या झाल्याचे वास्तव आहे.

पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद केल्या जाते. तेव्हापासून ऑक्टोबर २०२५ या कालावधीत २२,०३८ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये शासन मदतीसाठी ११,२९५ प्रकरणे पात्र ठरली तर त्यापेक्षा अधिक ११,३६६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे वर्षभरापासून ३७७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची विभागीय आयुक्तालयाची आकडेवारी आहे. हे सर्व शेतकरी केवळ अस्मानी-सुल्तानी संकटाचे नव्हे, तर शासन, प्रशासनाच्या अनास्थेचे बळी असल्याचा आरोप होत आहे.

नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, बँकांसह खासगी सावकारांचे कर्ज, मुलींचे लग्न, आजारपण आदींसह अन्य कारणांमुळे पश्चिम विदर्भात राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. यामध्ये यवतमाळ, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रकार वाढल्याचे वास्तव आहे.

२००१ पासून आत्महत्यायवतमाळ - ६४८९अमरावती - ५५४६बुलढाणा - ४५९२अकोला - ३२६२वाशिम - २१४९

दर आठ तासांत एक शेतकरी आत्महत्या

पश्चिम विदर्भात १० महिन्यांत म्हणजेच ३०५ दिवसांत ८८८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणजेच अमरावती विभागात दर आठ तासाला एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यामध्ये सर्वाधिक ३१६ शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात होत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : West Vidarbha: 888 Farmer Suicides in 10 Months, 87 During Diwali

Web Summary : Farmer suicides in West Vidarbha continue unabated. 888 farmers died in ten months, with 87 deaths occurring during Diwali. Since 2001, over 22,000 farmers have ended their lives, often due to debt, natural disasters and government apathy.
टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भAkolaअकोलाYavatmalयवतमाळwashimवाशिमbuldhanaबुलडाणा