शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

८८ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 13, 2017 00:10 IST

बारदाना उपलब्ध नाही आदी क्षुल्लक कारणांनी जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्र सातत्याने बंद ठेवल्या जाते.

मंदगतीचा परिणाम : नाफेड संलग्नित यंत्रणांचा ढिसाळ कारभार अमरावती : बारदाना उपलब्ध नाही आदी क्षुल्लक कारणांनी जिल्ह्यातील शासकीय तूर खरेदी केंद्र सातत्याने बंद ठेवल्या जाते. त्यामुळे जिल्ह्यातील दहा केंद्रांवर मंगळवारपर्यंत ८७ हजार ५०० क्विंटल तूर मोजणीसाठी बाकी आहे. यंत्रणांच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना नाहक फटका बसत आहे. सद्यस्थितीत चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर व मोर्शी तालुक्यात व्हिसीएमएफ व नाफेड तसेच अमरावती व धामणगाव येथे एफसीआय तसेच अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार दर्यापूर व वरुड येथे डिएमओद्वारा शासकीय तूर खरेदी डिसेंबरच्या अखेरीस करण्यात आली. आतापर्यंत या केंद्रावर २.६२ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची १३१.७ कोटी एवढी रक्कम आहे. अद्यापही काही केंद्रांवर १५ ते २० दिवसांचे चुकारे करणे बाकी आहे. एफसीआयचे अमरावती व धामणगाव येथील केंद्र बारदान्याअभावी बंद आहे. धामणगाव बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी बारदाना उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली असताना एफसीआयद्वारा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. मात्र भंडारा येथून एक लाख बारदाना मागविण्यात आला. यापैकी ३० हजार बारदाना एफसीआयला भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतर येथील शासकीय खरेदी केंद्रावर तुरीची मोजणी सुरु होणार आहे. (प्रतिनिधी)अशी आहे केंद्रनिहाय तूर मोजणी बाकी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८७ हजार ५०० क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये चांदूररेल्वे चार हजार क्विंटल, नांदगाव २५०० क्विंटल, मोर्शी ८ हजार क्विंटल, अमरावती २० हजार क्विंटल, धामणगाव १० हजार क्विंटल, अचलपूर ९ हजार क्विंटल, अंजनगाव सुर्जी ७५०० क्विंटल, चांदूरबाजार ३५०० क्विंटल, दर्यापूर १७ हजार क्विंटल व वरुड येथील केंद्रांवर सहा हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना नाहक त्रास बारदाना नाही, गोदाम नाही आदी कारणे दाखवून अचानकपणे तूर खरेदी बंद केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना माल मोजणीसाठी पडून आहे. तूर मोजणीदेखील मंदगतीने होत असल्याने शेतकऱ्यांचा नाहक ताटकडत बसावे लागते व तूर मोजणीपर्यंत मालाची जबाबदारी ही शेतकऱ्यांची असल्याने तूर चोरीस व वजन घटने याचा फटका शेतकऱ्यांनाच बसतो