ग्रामपंचायतींकरीता ७५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:12 AM2021-01-17T04:12:40+5:302021-01-17T04:12:40+5:30

अमरावती : जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायतींमध्ये ४,४५२ सदस्य निवडून देण्यासाठी १,९४८ केंद्रांवर ७ लाख ७२ हजार ४१८ मतदारांनी मतदानाचा हक्क ...

75% turnout for Gram Panchayats | ग्रामपंचायतींकरीता ७५ टक्के मतदान

ग्रामपंचायतींकरीता ७५ टक्के मतदान

Next

अमरावती : जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायतींमध्ये ४,४५२ सदस्य निवडून देण्यासाठी १,९४८ केंद्रांवर ७ लाख ७२ हजार ४१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या बळकटीकरणातील ही प्रक्रिया ७५.०५ टक्केवारी आहे. काही केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान सुरू असल्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाद्वारे शनिवारी ही टक्केवारी जाहीर करण्यात आली. आता सोमवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान झाले. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन यावेळी करण्यात आले. आता सर्व तालुक्याच्या मुख्यालयी १८ मार्चला मतमोजणी होणार आहे. यासाठी सर्व तालुक्यांची निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आहे.

उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याशिवाय मतमोजणी स्थळाच्या १०० मीटर परिसरात कुणालाच प्रवेश मिळणार नाही. यासाठी त्यांनी अधिकृत ओळखपत्र दाखवावे लागेल. मतमोजणी ठिकाणी कुठलेच झेरॉक्स, फॅक्स मशीन, ई-मेल आदी साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. याशिवाय मोबाईल फोन, वायरलेस सेट, कॅल्क्युलेटर आदी साधनांच्या वापरावरदेखील प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात स्पष्ट केले आहे.

बॉक्स

तालुकानिहाय अंतिम मतदान

तालुका स्त्री पुरुष एकूण टक्केवारी

अमरावती ३१,८६९ ३६७७९ ६८,६४८ ७३.३६

भातकुली २१,६९४ २४,८३३ ४६,५२७ ७२.५४

नांदगाव २७,९४५ ३०,३९५ ५७,८९० ७५.९६

दर्यापूर ३३,३९६ ३७,७७२ ७१,१६८ ७७.८१

अंजनगाव २५,०४९ २८,६२८ ५३,६७७ ७७.०३

तिवसा २२,२६२ २४,९७६ ४७२३८ ७१.५४

चांदूर रेल्वे १५,६८४ १७,४१५ ३३,०९९ ७५.९०

धामणगाव ३१,०३० ३४,४४३ ६५,४७३ ७७.४७

अचलपूर ३०,९१० ३५,५७२ ६६२४२ ७६.३९

चांदूर बाजार ३४,४४७ ४०,७०५ ७५,१५२ ७४.९०

मोर्शी २६,१६९ ३०,३३२ ५६,५०१ ७१.७९

वरूड ३१,२२७ ३५,२९९ ६६,५२६ ७६.१६

धारणी ३१,२२७ ३५,२९९ ४२,१०५ ७२.२८

चिखलदरा १०,३२६ ११,६०५ २१,९३२ ७७.४८

एकूण ३,६१,७७१ ४,१०,६४६ ७,७२,४१८ ७५.०५

Web Title: 75% turnout for Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.