शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
3
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
4
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
5
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
6
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
7
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
8
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
9
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
10
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
11
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
12
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
13
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
14
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
15
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
16
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
17
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
18
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
19
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
20
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात ७४७ जणांचे तोंड बंद; आरोग्य विभागाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 22:08 IST

आरोग्य मंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्यभरात मुख स्वास्थ्य तपासणी मोहीम राबविण्यात आली.

- इंदल चव्हाणअमरावती : आरोग्य मंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्यभरात मुख स्वास्थ्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार अमरावती विभागात १ लाख ३४ हजार ९९७ जणांची मुख तपासणी करण्यात आली. त्यातील ७४७ रुग्णांचे तोंड उघडणे अशक्य असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर यवतमाळ आणि अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक आर.एस. फारुकी यांनी दिली.

सद्यस्थितीत मुखाचा कर्करोग वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने माजी आरोग्यमंत्री अरविंद सावंत यांनी आरोग्य विभागाला राज्यातील मुख स्वास्थ्य तपासणीचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यभरात दंत वैद्यकीय विभागाद्वारा शहर आणि ग्रामीण भागात विविध प्रकारे तपासणी करण्यात आली. अमरावती विभागात ३० वर्षे वयोगटातील एकूण १ लाख ३४ हजार ९९७ रुग्णांची तपासणी झाली. यामध्ये ६४ हजार ७७८ महिला व ७० हजार २१९ पुरुषांचा समावेश आहे. यापैकी ९७ हजार ४७७ नागरिकांचे मुख स्वास्थ्य स्वच्छ, तर २९ हजार ९०४ नागरिकांचे मुख स्वास्थ्य अस्वच्छ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दारू सेवनामुळे मुखरोगाने ग्रस्त १२ हजार ३४ रुग्ण आहेत. तंबाखू, सुपारी सेवनामुळे मुखरोगग्रस्तांची संख्या २४ हजार ७ एवढी आहे. मात्र, गुटखा तासंतास तोंडात ठेवण्याची सवय जडलेल्या बहुतांश रुग्णांपैकी ७४७ रुग्णांचे तोंड बंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच खानपानात अतिरेक केल्याने गाल, ओठ, जीफ, टाळू यापैकी एक किंवा अनेक ठिकाणी पांढरा चट्टा आलेले १७८ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच लाल चट्टा असलेले ९२ आणि तोंडात दीर्घकाळ जखम असलेले ४६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २७० रुग्णांवर यवतमाळ आणि अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाद्वारा प्राप्त झाली आहे.

पाचही जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यामार्फत मुख स्वास्थ्य तपासणी ऑक्टोबर महिन्यात करण्यात आली. ६ नोव्हेंबर रोजी सदर अहवाल प्राप्त झाला. यातील संदर्भित २७० रुग्णांवर यवतमाळ आणि अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे अकोला परिमंडळातील आरोग्य संचालक आर.एस. फारुकी यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरAmravatiअमरावती