शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
4
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
5
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
6
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
7
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
8
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
9
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
10
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
11
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
12
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
13
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
14
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
15
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
16
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
17
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
18
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
19
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
20
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर

राज्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त, राज्यपालांच्या अधिसूचनांकडे दुर्लक्ष

By गणेश वासनिक | Updated: January 16, 2023 21:13 IST

अनुसूचित क्षेत्र उपेक्षित, आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

अमरावती : राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील १३ जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील वर्षानुवर्षे भरती न केल्यामुळे शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त आहेत. एकट्या पालघर जिल्ह्यात मराठी माध्यमाची सर्वात जास्त ४४८१, तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी १७ पदे रिक्त आहे. उर्दू माध्यमाची पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त ३६ पदे रिक्त आहेत, तर नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी ३ पदे रिक्त आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र एकही जागा रिक्त नसल्याचे दाखविण्यात आले आहे. याबाबतची माहिती शासनाने शिक्षक बदली पोर्टलवर ४ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर केलेली आहेत.

आदिवासीबहुल भागात बिगर आदिवासी कर्मचारी कामात फारसा रस घेत नाही. कर्मचाऱ्यांना स्थानिक बोलीभाषा अवगत नसल्यामुळे आदिवासींना सेवा, सुविधा पुरविण्यात अडचणी येतात. अनुसूचित क्षेत्रात विविध सेवा, सुविधांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने राज्यपालांनी राज्यघटनेतील ५व्या अनुसूचितील परिशिष्ट ५ (१) नुसार अधिसूचना काढून १७ संवर्गातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीमधून भरण्याचा निर्णय नऊ वर्षांपूर्वीच घेतला आहे. यात 'शिक्षक' हे पद आहे.

अनुसूचित क्षेत्रातील शिक्षकांची भरतीच करण्यात न आल्यामुळे ७ हजार १८७ पदे सन २०१४ पासून रिक्तच आहेत. अनुसूचित क्षेत्रात व बिगर अनुसूचित क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये दरवर्षी बदली, सेवानिवृत्ती व इतर कारणांमुळे रिक्त होणाऱ्या पदांपैकी अनुसूचित क्षेत्रात रिक्त होणारी पदे, जास्तीत जास्त एकूण रिक्त पदांच्या २० टक्के पदे दरवर्षी स्थानिक आदिवासी उमेदवारांमधून भरावयाची आहेत. शिक्षकांची पदे रिक्त असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून, राज्यपालांच्या आदेशालाही शासन-प्रशासन जुमानत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.राज्यपालांच्या अधिसूचनांकडे दुर्लक्षराज्यपाल यांनी ९ जून २०१४, १४ ऑगस्ट २०१४, ३१ ऑक्टोबर २०१४, ३ जून २०१५ रोजी अधिसूचना काढलेल्या आहेत. या अधिसूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ मार्च २०१५ व २६ जून २०१५ रोजी शासन निर्णय काढले. यानंतरही राज्यपाल यांनी ९ ऑगस्ट २०१६ आणि २३ नोव्हेंबर २०१६ रोजी अधिसूचना काढल्या. परंतु या अधिसूचनांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अद्यापही अनुसूचित क्षेत्रातील १७ संवर्गातील पदे भरण्यात आलेली नाहीत.जिल्हा, माध्यम निहाय शिक्षकांची रिक्त पदेजिल्हा, मराठी, उर्दू१) अहमदनगर २८, ००२) अमरावती १६५, १४३) धुळे ५३, ७४) गडचिरोली २६५, ००५) जळगाव १८२, १२६) नांदेड १२६, ००७) नंदुरबार ३००, ३१८) नाशिक ४१७, ० ३९) पालघर ४४८१, ३६१०) पुणे १७, ००११) ठाणे ५३३, १४१२) यवतमाळ ५०३, ००१३) चंद्रपूर ००, ००७०७०         ११७अनुसूचित क्षेत्रातील १७ संवर्गातील पदांची भरती तर सोडाच, परंतु शिक्षक या एका संवर्गातील पदे आठ वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. आता राज्य शासनाने तरी अनुसूचित क्षेत्रातील पदभरती भरण्यात यावी.-अजाबराव उईके, राज्य उपाध्यक्ष, ट्रायबल फोरम महाराष्ट्र.

टॅग्स :AmravatiअमरावतीTeacherशिक्षकSchoolशाळा