६ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे सात कोटी; गतवर्षीच्या खरिपातील नुकसानीचा यंदाच्या वर्षात परतावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 16:43 IST2023-03-08T16:41:42+5:302023-03-08T16:43:03+5:30
७,१५२ शेतकरी परताव्याच्या प्रतीक्षेत

६ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे सात कोटी; गतवर्षीच्या खरिपातील नुकसानीचा यंदाच्या वर्षात परतावा
गजानन मोहोड
अमरावती : गतवर्षी पावसाने झालेल्या नुकसानासाठी प्रलंबित २७ हजार शेतकऱ्यांपैकी ६,१२९ खातेदारांना मंगळवारपासून पीक विमा परतावा कंपनीद्वारा जमा करण्यात येत आहे. अद्याप स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले १४ हजार व काढणीपश्चात पिकांचे नुकसान झालेले ७,१५२ शेतकरी परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत तब्बल ८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली होती व यामध्ये जिल्ह्यातील किमान ३ लाख हेक्टरमधील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमधील १.२६ लाख शेतकऱ्यांनी कंपनीकडे पूर्वसूचना अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २६,३८४ अर्ज कंपनीद्वारा विविध कारणांनी नाकारण्यात आलेले आहे. याशिवाय ७२,६३९ शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी आतापर्यंत ७१.९४ कोटींचा परतावा पीक विमा कंपनीद्वारा देण्यात आलेला आहे